शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक जोगेश्वरी कुंडात अडकलेल्या गोमातेची थरारक सुटका! सुरक्षारक्षकांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:33 IST

वेरूळच्या डोंगरमाथ्यावर मृत्यूच्या छायेतून गोमातेची सुटका

- सुनील घोडकेखुलताबाद: अंत्यत धोकादायक असलेल्या वेरूळ लेणीच्या डोंगरमाथ्यावरील जोगेश्वरी लेणीच्या कुंडात अडकलेल्या गोमातेला सुरक्षारक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून सुखरूप बाहेर काढले आहे. जोगेश्वरी आणि गणेश लेणी परिसर येथील कुंडांमुळे अंत्यत धोकादायक असून याठिकाणी पर्यटकांनी देखील सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी क्रमांक २९ च्या वर जोगेश्वरी कुंड व गणेश लेणी आहे. जोगेश्वरी कुंडातून येळगंगा नदी वाहते व तेच पाणी वेरूळ लेणी धबधबा म्हणून खाली जोरदारपणे कोसळते. जोगेश्वरी कुंड अंत्यत धोकादायक व खोल आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या आसपास सुरक्षारक्षक पुंडलिक सोनवणे हे जोगेश्वरी कुंड व गणेश लेणी परिसरात कर्तव्यावर होते. त्यांना जोगेश्वरी कुंड परिसरातील सर्वात धोकादायक असलेल्या गुप्तकुंडावर एक गाय अडकलेली दिसली. या ठिकाणी पाण्याचा जोरदार प्रवाह असतानाही गाय जीव वाचवत मोठ्या प्रयत्नाने कुंडाच्या काठावर तग धरून होती.

दोन तासांत काढले बाहेरसुरक्षारक्षक सोनवणे यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर अर्ध्यातासात सचिन ठाकरे, प्रदीप साहू, अमोल टाकळकर, शिवाजी मिसाळ, अनिल बोडखे, सचिन राठोड, गणेश चव्हाण, सागर दळवी, प्रकाश सोनवणे, प्रेमचंद वानरे, रामू गायकवाड, बाबासाहेब चव्हाण, बाळू गोल्हार, संदीप पवार, विजय ऋषी, परमेश्वर अर्जूने, ज्ञानेश्वर गायकवाड हे एसआयएसचे सुरक्षारक्षक व पुरातत्व विभागाचे विनोद कणसे, अनिल सोनवणे, लहू बरडे आदींनी जोगेश्वरी कुंड परिसरात दोरी व मोठे नाडे याच्या साह्याने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढून सुटकेचा निश्वास सोडला. 

काही दिवसांपूर्वीच युवकाचा मृत्यूयावेळी सचिन ठाकरे यांनी सांगितले की,  गाय ही गुप्तकुंडावर अडकलेले होती. याठिकाणी जोरदार पाणी कोसळत असल्याने पाण्याचे जोरदार प्रवाह होता. यदा कदाचित गाय खाली कुंडात पडली असती तर जिवंत राहिली नसती. शिवाय कुंड खुप खोल असल्याने शोध घेण अशक्य झाले असते. गेल्या वर्षी याच ठिकाणी एक बैल खाली पडून मृत्युमुखी पडला होता. तर काही दिवसांपूर्वीच पर्यटनासाठी आलेला एक युवक भावाला वाचविताना कुंडात पडून मृत्युमुखी पडला होता.

धोकादायक कुंडजोगेश्वरी कुंड, गणेश लेणी परिसर अंत्यत धोकादायक असून या ठिकाणी पर्यटकांनी जाऊच नये असे आवाहन भारतीय पुरातत्व विभागाचे संवर्धन सहाय्यक राजेश वाकलेकर यांनी केले आहे.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAccidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर