तीन वर्षांनंतर झाली सोनोग्राफी मशीन सुरू

By Admin | Updated: December 20, 2014 23:29 IST2014-12-20T23:29:20+5:302014-12-20T23:29:20+5:30

परळी: येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी सील केली होती़ आता ही मशीन सुरू करण्याची परवानगी दिल्याने गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे़

Three years later Sonography machine started | तीन वर्षांनंतर झाली सोनोग्राफी मशीन सुरू

तीन वर्षांनंतर झाली सोनोग्राफी मशीन सुरू

परळी: येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी सील केली होती़ आता ही मशीन सुरू करण्याची परवानगी दिल्याने गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे़
नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ वैद्यकीय अधीक्षक डॉ़ धनंजय चाकूरकर, डॉ़ रामेश्वर लटपटे, नगरसेवक राजेंद्र सोनी, डॉ़ दिनेश कुरमे आदींची प्रमुख उपस्थिती होती़
ही मशीन बंद असल्याने सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रूग्णलयातून तपासणी करावी लागत असे़ मात्र आता मशीन सुरू करण्याची परवानगी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्याने खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन तपासणी करावी लागणार नाही़ त्यांच्याकडून रूग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात होती़ मशीन सुरू झाल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे़ यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ रूग्णांसह कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ (वार्ताहर)

Web Title: Three years later Sonography machine started