शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

पैठण शहरात भरदिवसा तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:43 IST

उच्चभ्रू वसाहतीत दहशत : कुलूप लावून बाहेर गेलेल्या फ्लॅटला केले लक्ष्य

पैठण : पैठण शहरातील शशीविहार व नाथविहार या उच्चभ्रू वसाहतीत शनिवारी भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचे कडीकोंडे तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास केला. गजबजलेल्या वसाहतीत भरदुपारी चोरी झाल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नाथविहार व शशीविहार या दोन वसाहती नव्याने विकसित करण्यात आल्या आहेत. फ्लॅट सिस्टीमच्या अनेक विंग या भागात असून, मोठ्या संख्येने या ठिकाणी रहिवासी राहतात. दरम्यान, शनिवारी दुपारी चोरट्यांनी यातील कुलूप लावून बाहेर गेलेल्या फ्लॅटला टार्गेट केले. शशीविहार येथील कैलाशकुमार दुर्गादास चौधरी हे फ्लॅटला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले होते. त्यांच्या घराच्या कुलपाचा कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील ३० हजार ५०० रुपये रोख घेऊन बाजूलाच असलेले हनुमान मापारी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील एलईडी टीव्ही उचलून नेला. याचप्रमाणे नाथविहार या भागातून पंकज हैबत बेहरे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला. रात्री घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाल्याने चौधरी, मापारी व बेहरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.दोन महिला, एक पुरुष सीसीटीव्हीत कैदशशीविहार परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी तीन वाजून वीस मिनिटाला चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळून एका मोपेडवर एक पुरुष व दोन महिला या भागात येऊन ३.५० ला बाहेर पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलांसोबतच्या पुरुषाने आपला चेहरा उघडाच ठेवलेला आहे. या त्रिकुटाने आणखी तीन घरांचे कुलूप तोडले. मात्र, कुणीतरी आल्याने त्यांना काढता पाय घ्यावा लागला. घरी चोरी झाली नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी