शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी तिघांचेच निलंबन

By admin | Updated: July 11, 2016 01:13 IST

औरंगाबाद : लाच घेतल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

औरंगाबाद : लाच घेतल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार दर्जाच्या बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तसेच त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यास परवानगी देण्याची प्रकरणे मात्र शासनस्तरावर प्रलंबित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील सात जणांविरुद्ध गेल्या दोन वर्षांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश होता, जिल्हा प्रशासनाने यापैकी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करून दोघांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यास परवानगी दिली आहे. औरंगाबाद तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षातील लिपिक गंगाधर गायकवाड यांच्याविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी २४ जुलै २०१५ रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रशासनाने त्यांना यावर्षी ३ मार्च रोजी निलंबित करून त्याच दिवशी खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती. बनोटी (ता. सोयगाव) सज्जाचे तलाठी भगतसिंग पवार यांच्याविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात १२ आॅगस्ट २०१४ रोजी लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार यांच्यावर २३ मार्च २०१५ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली तसेच १० मार्च २०१६ रोजी खटला दाखल करण्याची परवानगी देण्यात आली. बोडखा (ता. खुलताबाद) सज्जाचे तलाठी शेख अय्युब पापामियाँ यांच्याविरुद्ध २१ जानेवारी रोजी लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना १४ मार्च रोजी निलंबित करण्यात आले. अय्युब यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. वैजापूरच्या तहसील कार्यालयातील लिपिक दिलीपसिंह पवार यांच्याविरुद्ध १२ सप्टेंबर २०१४ रोजी वैजापूर ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.अडकुणे, पडघन यांच्यावर कारवाई नाहीऔरंगाबादचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात २२ फेब्रुवारी २०१३ रोजी लाचेचा गुन्हा दाखल झाला होता. अडकुणे यांना निलंबित न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सध्या ते पालघर येथे उपजिल्हाधिकारी आहेत. वैजापूरचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत पडघन यांच्याविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पडघन यांनादेखील महसूल खात्याने निलंबित केले नाही. या दोघांविरुद्ध खटला दाखल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.तलाठ्यांचे प्रस्ताव केले परतलाचेच्या सापळ्यात अडकलेल्या तलाठ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यास परवानगी मागणारे प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते. तलाठी संवर्गातील कर्मचारी हे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करीत असतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे गरजेचे होते. टाकळी कदीम (ता. गंगापूर) येथील तत्कालीन तलाठी इंद्रभान सोनवणे यांच्याविरुद्ध दौलताबाद ठाण्यात ३१ आॅगस्ट २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनवणे यांच्याबाबतचा प्रस्ताव वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करणे गरजेचे होते. त्यामुळे हा प्रस्ताव लाचलुचपत विभागाकडे परत पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.