तिघींना जन्मठेपेची शिक्षा

By Admin | Updated: July 26, 2014 00:40 IST2014-07-26T00:29:06+5:302014-07-26T00:40:52+5:30

उमरगा : मालमत्तेसाठी सुनेचा शारीरिक, मानसिक जाच करीत रॉकेल ओतून पेटवून देत जिवे मारल्याप्रकरणी सासू, जाऊ व नणंदेस उमरगा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम़एसग़ुगले यांनी जन्मठेपेची शिक्षा

Three life sentence for life imprisonment | तिघींना जन्मठेपेची शिक्षा

तिघींना जन्मठेपेची शिक्षा

उमरगा : मालमत्तेसाठी सुनेचा शारीरिक, मानसिक जाच करीत रॉकेल ओतून पेटवून देत जिवे मारल्याप्रकरणी सासू, जाऊ व नणंदेस उमरगा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम़एसग़ुगले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ ही घटना बेळंब (ता़उमरगा) येथे १५ मे २०११ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून, विवाहितेचा १६ मे रोजी २०११ सोलापूर येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस़ए़पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलबर्गा जिल्ह्यातील शरणबसप्पा बिराजदार यांची बहीण महानंदा हिचा बेळंब (ता़उमरगा) येथील दयानंद गुरबसप्पा खजुरे याच्याशी विवाह झाला होता़ दयानंद खजुरे यांचा २४ एप्रिल २०११ रोजी आजाराने मृत्यू झाला़ दयानंदच्या मृत्यूनंतर सिद्राम खजुरे, मामा विश्वनाथ बोकडे, दीर रवींद्र खजुरे, शिवानंद खजुरे, सासू नवलाबाई खजुरे, जाऊ गंगाबाई खजुरे, जाऊ जयाबाई उर्फ जयश्री खजुरे, नणंद मल्लमाबाई खजुरे (सर्व रा़बेळंब) यांनी प्रॉपर्टीसाठी महानंदा ही माहेरी निघून जावी म्हणून शारीरिक, मानसिक त्रास देत होते़ याची माहिती महानंदा हिने आई-वडिलांना दिली होती़
महानंदाचे वडील विठ्ठल बिराजदार (रा़जिडगा ता़आळंद), महानंदाचा भाऊ व नातेवाईक १५ मे रोजी सायंकाळी बेळंब येथे आले होते़ महानंदा ही होरपळलेल्या अवस्थेत स्वयंपाकरूम समोर त्यांना दिसून आली़ तिस विचारले असता दहा-पंधरा मिनिटापूर्वी वरील लोकांनी ‘तुला मूलबाळ नाही, तुझा नवरापण मेला आहे, तुझे येथे काही नाही, तुला आम्ही शेती वगैरे देणार नाही’ असे म्हणत पेटवून दिल्याचे सांगितले़ तसेच सासरच्या मंडळींनी मी बेळंब येथे रहायचे असेल तर पैसे घेऊन ये असा तगादा लावला होता़ महानंदा यांच्या वडिलांनी व भावाने त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले़ तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, उपचारादरम्यान १६ मे २०११ रोजी महानंदा यांचा सोलापूर येथील रूग्णालयात मृत्यू झाला़ वरील आरोपींविरूध्द मुरूम पोलिस ठाण्यात ३०२ सह ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तत्कालीन तपासाधिकारी सपोनि एस़ बी़ गायकवाड यांनी तपासांती उमरगा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ त्यानंतर हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले़
सुनावणीदरम्यान साक्षीदारांची साक्ष, समोर आलेले पुरावे आणि अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ए़एस़पोतदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम़एसग़ुगले यांनी सासू नवलाबाई खजुरे, जाऊ गंगाबाई सिद्राम खजुरे, नणंद मल्लमाबाई खजुरे यांना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच दंड न भरल्यास एक वर्षे सक्तजुरीही ठोठावली़ तर इतर पाच आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली़ (प्रतिनिधी)

Web Title: Three life sentence for life imprisonment