शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:12 IST

शिरीष शिंदे ल्ल बीड मान्सून सुरु होण्यास अद्याप महिन्याभराचा कालावधी असला तरी पीक कर्ज वाटपास एप्रिल अखेर पासून सुरुवात झाली आहे.

आढावा बैठक : एप्रिल अखेरपासून कर्ज वाटपास सुरुवात; ३ टक्के वाटप पूर्णशिरीष शिंदे ल्ल बीडमान्सून सुरु होण्यास अद्याप महिन्याभराचा कालावधी असला तरी पीक कर्ज वाटपास एप्रिल अखेर पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख पाच हजार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १ हजार ७५० कोटी रुपये पीक कर्ज देण्यात येणार असून या संदर्भात दर आठवड्यास आढावा बैठक घेण्यात येत आहे. १० एप्रिलपर्यंत ३ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. गत वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ५७२ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. यासह इतर नव्या पन्नास हजार शेतकऱ्यांचा यादीत समावेश झाल्याने तीन लाख पाच हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होणार आहे. दरम्यान, खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक कर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास अडचणी आल्यास त्याची दखल थेट जिल्हाधिकारी घेत आहेत. ७ हजार १२५ शेतकरी नुतणीकरण म्हणजेच जुनं-नव पीक कर्ज करतील. त्यांना ३६ कोटी ६२ लाख रुपये कर्ज या पद्धतीने वाटप होईल. ९ हजार ६३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ११ लाख पीक कर्ज देण्यात येणार आहे. मागच्यावर्षी जिल्ह्यातील २०२ बँक शाखांनी २ लाख ४२ हजार शेतकऱ्यांना पीक र्ज वाटप केले होते. यंदा त्यात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ आहे. बँकांना ८० टक्के पीक विमा वाटपाचे उद्दिष्टमंगळवारी पीक कर्ज आढावा बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे, कृषी अधीक्षक रमेश भताने, एसबीएचचे पत्की यांच्यासह बँक अधिकारी उपस्थित होते. बँकांच्या पीक कर्जासंदर्भात अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. जिल्ह्यात ८ लाख शेतकरी असून यावर्षी ८० टक्के पीक विमा वाटप झाला पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.बँक अधिकाऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आठवड्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली जात आहे. आतापर्यंत ३ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून त्यात पुढील महिन्यात वाढ होईल. -गंगाधर बोकाडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी