तीन गाड्या फोडल्या

By Admin | Updated: February 9, 2015 00:45 IST2015-02-09T00:23:48+5:302015-02-09T00:45:52+5:30

माजलगाव : शनिवारी रात्री येथील बसस्थानकासमोर तीन वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. माथेफिरूंनी धुडगूस घातल्याने दहशत निर्माण झाली आहे.

Three cars were flown | तीन गाड्या फोडल्या

तीन गाड्या फोडल्या

माजलगाव : शनिवारी रात्री येथील बसस्थानकासमोर तीन वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. माथेफिरूंनी धुडगूस घातल्याने दहशत निर्माण झाली आहे.
व्यवसायानिमित्त काही व्यापारी शनिवारी येथे आले होते. त्यांनी आपली वाहने बसस्थानकासमोर उभी केली होती. रात्री माथेफिरूंनी एमएच २७ एआर २२०२, एमएच २७ बी ७७८ व एमएच २० बीजे ८८७९ या क्रमाकांच्या वाहनांचे नुकसान केले. यात ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर विनोद ठाकूर, हरीश खत्री (दोघेही रा. अमरावती) व भारत परतवाणी (रा. औरंगाबाद) यांनी शहर ठाणे गाठून फिर्याद दिली. (वार्ताहर)

Web Title: Three cars were flown