शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षणाकडे हजारो शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

चापोली : पीकवाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे.

चापोली : पीकवाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीमध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत, हे जर कळाले तर सुयोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढविता येते. मात्र शेतकर्‍यांची उदासीनता व माती परीक्षण संदर्भातील जनजागृतीअभावी चापोली परिसरातील हजारो शेतकर्‍यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपिकता सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्न घटकांची गरज असते. ही गरज रासायनिक खताद्वारे पुरविली जाते. प्रमाणशीर खते नाही दिल्यास पिके चांगली येत नाहीत. परिणामी, अनावश्यक खर्चात वाढ होते. माती परीक्षणाने पिके वाढीसाठी जे आवश्यक घटक आहेत, त्यांचे जमिनीमधील प्रमाण कळते. त्यानुसार जे घटक जमिनीमध्ये कमी प्रमाणात आहेत, त्याच घटकांचा पुरवठा केल्यास बचत होईल व उत्पन्नही वाढेल. शेतकरी हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून असतो. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे गणित चुकते. जेवढा पैसा घातला आहे, तेवढाही निघत नाही व पुढील हंगामासाठी परत कर्जबाजारी होऊन खत-बियाणे घ्यावे लागतात. मागील तीन ते चार वर्षांचा विचार केला तर आज खताचे भाव दुपटीने वाढले आहेत. जर शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केली तर अनावश्यक खर्चाला लगाम लागू शकतो. त्यासाठी जर शेतकर्‍यांनी माती परीक्षण केले तर जे घटक जमिनीत कमी प्रमाणात आहेत, तेवढ्याच घटकाचा पुरवठा केला तर खतावरील अनावश्यक खर्च टाळला जाईल व पिकाच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल. लातूर येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा असून, मातीमधील तीन घटक तपासणीसाठी २५ रुपये, विशेष १६ घटकांच्या तपासणीसाठी २०० रुपये शुल्क आकारले जाते. खतावरील अनावश्यक खर्चाचा विचार केला तर हे शुल्क कमी आहे. मात्र शेतकर्‍यांची उदासीनता व जनजागृतीच्या अभावामुळे माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) माती परीक्षणाबाबत जनजागृती करू... कृषी विभागाच्या वतीने माती परीक्षणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. परंतु, याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती न केल्यामुळे शेतकर्‍यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविली आहे. परंतु, याबाबत ग्रामसभेत बैठक घेऊन सोमवारपासून जनजागृती करणार असल्याचे कृषी सहायक एच.डी. रोकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.