शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

हजारांसाठी शिक्षा अन् लाखांसाठी प्रतीक्षा !

By admin | Updated: July 26, 2014 00:38 IST

संजय तिपाले, बीड घोटाळा हजारांमध्ये केला तर तातडीने शिक्षा होते;पण लाखोंमध्ये असेल तर कारवाई होईलच याची शाश्वती नाही.

संजय तिपाले, बीडघोटाळा हजारांमध्ये केला तर तातडीने शिक्षा होते;पण लाखोंमध्ये असेल तर कारवाई होईलच याची शाश्वती नाही. मोठ्या घोेटाळ्यात अडकलेल्यांना अभय देत कागदी घोडे कसे नाचवले जातात हे बघायचे असेल तर जिल्हा परिषदेकडे पहा. शौचालय कामांत ६२ हजारांच्या घोटाळ्याची तक्रार असलेल्या ग्रामसेवकाचे तडकाफडकी निलंबन केले;पण ज्या ग्रामसेवकावर ३६ लाखांच्या घोटाळ्याचा आरोप आहे, त्याच्यावर कारवाईसाठी महिन्यापासून मुहूर्त मिळाला नाही.भारत निर्मल अभियानातून शौचालय बांधणाऱ्या कुटुंबियांना अनुदान स्वरुपात ४ हजार ६०० रुपये दिले जातात. शिरुर, परळी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये शौचालयांसाठी आलेला निधी ग्रामसेवकांनीच लाटल्याची प्रकरणे पुढे आली. शिरुर तालुक्यातील घोटाळा ३६ लाखांहून अधिक आहे तर परळीतील अपहार केवळ ६२ हजार इतका आहे. ६२ हजारांचा अपहार केल्याचा ठपका ठेवून मांडवा येथील ग्रामसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली; पण शिरुर तालुक्यातील वारणी व गोमळवाडा येथील ३६ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणात अद्याप कारवाईची दिशाच ठरली नाही. काय होते शिरुरचे अपहार प्रकरण?शिरुर तालुक्यातील वारणी व गोमळवाडा या दोन्ही गावच्या ग्रामसेवकपदाचा पदभार अशोक कदम यांच्याकडे आहे. शौचालयांसाठी आलेली रक्कम बँक खात्यातून परस्पर उचलून तब्बल ३६ लाख ४९ हजार ७२४ रुपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी बाबासाहेब सूर्यवंशी यांनी ग्रामसेवक अशोक कदम यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली होती. मांडव्याच्या ग्रामसेवकाचे निलंबनपरळी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्यावर शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आलेला ६२ हजारांचा निधी परस्पर उचलल्याचा ठपका आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल पाठविल्यावर पंचायत विभागातून त्यांच्या निलंबनाची संचिका सीईओंकडे गेली. शुक्रवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश सीईओ राजीव जवळेकर यांच्या स्वाक्षरीने निघाले.पाठीशी घातले जाणार नाही - कुरेशीमांडव्याच्या ग्रामसेवकावर कारवाई झाली अन् शिरुरच्या ग्रामसेवकाला वाचविले जात आहे, अशातला काही प्रकार नाही.शिरुरमधील घोटाळा मोठा आहे, त्यामुळे चौकशीसाठी विलंब लागत आहे. तेथे केवळ ग्रामसेवक दोषी आहे असे नाही तर इतर अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले. अनियमितता करणाऱ्यांना कधीच पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिला.माहिती देण्यास टाळाटाळ मांडवा येथील ग्रामसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या निलंबनाच्या आदेशाची नोंद जावक रजिस्टरला झाली. निलंबन आदेशाची माहिती मागितली असता जावक विभागातील लिपिक हनुमंत डोईफोडे यांनी टाळाटाळ केली. निलंबन आदेश दडविण्याचा प्रयत्न करुन ‘मी माहिती देणार नाही...’ असे उत्तर त्यांनी दिले.