शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सिद्धार्थ उद्यानातील तिसरा डोळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 7:15 PM

देशभरात सध्या सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य दिले जात असताना महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

औरंगाबाद : देशभरात सध्या सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य दिले जात असताना महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. देखभाल-दुरुस्तीसाठी केवळ ५० हजारांचा खर्च आहे; परंतु त्यास मंजुरी मिळत नसल्याने ‘सीसीटीव्ही’ची दुरुस्ती होत नाही.

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे नेहमीच पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मनपाने उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा आढावा घेतला. त्यावेळी ही माहिती समोर आली. उद्यानातील सीसीटीव्ही सुरू आहेत का, अशी विचारणा महापौरांनी अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, समोरच्या भागातील तेवढे सुरू आहेत. मात्र, आतील सीसीटीव्ही बंद आहेत. दुरुस्तीसाठी ४९ हजार रुपयांची संचिका तयार करून ती प्रशासनाकडे सादर केली; परंतु त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती ऐकून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. देशभराबरोबर शहरातही अलर्ट आहे. कडेकोट सुरक्षेवर भर दिला जात असताना मनपा प्रशासन सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.३.५० कोटींचे उत्पन्नमनपाला सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून वर्षाकाठी ३.५० कोटींचे उत्पन्न मिळते. त्यातुलनेत प्राणिसंग्रहालयातील कामांवर केवळ २० लाखांचा खर्च झाल्याची माहिती महापौरांच्या बैठकीत समोर आली, तरीही निधीसाठी प्रशासनाकडे हात पसविण्याची वेळ येत आहे. त्यामुळे एप्रिलपासून उद्यानाचे स्वतंत्र खाते उघडण्याची सूचना महापौरांनी केली.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद