कृषीपंपधारकांवरील ‘भार’ होणार कमी

By Admin | Updated: March 4, 2015 00:24 IST2015-03-04T00:13:15+5:302015-03-04T00:24:20+5:30

बीड: जिल्ह्यात एकात्मिक योजनेअंतर्गत २२ तर पायाभूत आराखडा विकास योजनअंतर्गत १२ उपकेंद्रांचे काम सुरू आहे. सद्यस्थितीला ८ उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे.

There will be less 'weight' on agricultural pumps | कृषीपंपधारकांवरील ‘भार’ होणार कमी

कृषीपंपधारकांवरील ‘भार’ होणार कमी


बीड: जिल्ह्यात एकात्मिक योजनेअंतर्गत २२ तर पायाभूत आराखडा विकास योजनअंतर्गत १२ उपकेंद्रांचे काम सुरू आहे. सद्यस्थितीला ८ उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. वर्षाअखेरीस उर्वरित २७ उपकेंद्राचे काम पूर्ण होणार असून कृषीपंप धारकांवरील विजेचा भार कमी होणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही कृषीपंप ग्राहकांकडे आहे. तरीही या विकासात्मक योजनेअंतर्गत शेवटच्या ग्राहकांना त्याचा फायदा देण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात आली आहे. परिमंडळात एकूण ८५ उपकेंद्रांना मान्यता मिळाली असून सर्वाधिक उपकेंद्र ही बीड मंडळात कार्यन्वित आहेत. योजनेतील कामाला प्रत्यक्षात २०१३ साली सुरवात झाली आहे. अद्यापपर्यंत ८ उपकेंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. चालू वर्षाअखेरीस ही योजना सबंध जिल्ह्यात राबविणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.
सध्या क्षमतेपेक्षा अधिक ग्राहाकांचा लोड उपकेंद्रावर येत आहे. त्यामुळे सुरळीत विद्युत पुरवठा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. ग्राहक संख्येच्या प्रमाणानुसार उपकेंद्राची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे उपकेंद्रावर भार कमी पडणार असून ग्राहकांच्या तक्रारीमध्येही घट होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There will be less 'weight' on agricultural pumps