शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला विमा नसल्याने संताप

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

विलास भोसले, पाटोदा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत कांदा पिकाचा समावेश नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़

विलास भोसले, पाटोदाराष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत कांदा पिकाचा समावेश नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़ उसापेक्षा अधिक विम्याचा हप्ता कापसाला असल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे़राज्य सरकारचा कृषी विभाग आणि राष्ट्रीय पीक विमा योजना संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या कृषी पिकांना विमा कवच पुरवित आहे़ जिल्ह्यात कापूस, बाजरी, तीळ, तूर, भात, खरीप ज्वारी, भूईमुग, सोयाबीन, सूर्यफूल आदी पिकांना महसूल मंडळ निहाय विमा कवच दिलेले आहे़ असे असले तरी जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळात कांद्याला विमा संरक्षण दिले नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़ जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकरी विविध अडचणींचा सामना करीत आहे़ शेतकऱ्यांसमोर कधी दुष्काळ तर कधी गारपीटचे संकट असते़ यामुळे अनेकदा हातातोंडाशी आलेला घासही हिरावलेल्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत़ त्यामुळे शेतकरी आता दूध पोळाल्याने ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबित असल्याचे दिसून येत आहे़ एकीकडे शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा यासाठी अधिकाऱ्यांसह सर्वच प्रयत्न करीत आहेत़ यामुळे शेतकऱ्यांमध्येही जागृती निर्माण झाली असून शेतकरी पीक विमा भरण्यासाठी बँकेत गर्दीच गर्दी करीत असल्याचे चित्र जिल्हाभरात पहावयास मिळत आहे़ असे असले तरी दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केला आहे़वास्तविक बीड जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत़ कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान दिले आहे़ तसेच कडा येथे कांदा खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ आहे़ विशेष म्हणजे कडा येथील या बाजारपेठेचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो़ त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी कॉ़ महादेव नागरगोजे यांच्यासह शेतकऱ्यांमधून केली जात आहे़कापूस पिकाला हेक्टरी २१ हजार २०० रुपयांचे संरक्षण देण्यात आले आहे़ ६० टक्के जोखीम स्तर असलेल्या या पिकाला तेरा टक्के सर्वसाधारण हप्ता आहे़ तर उसाला ८० टक्के जोखीम असून विमा हप्ता केवळ ८ टक्क्यांनीच आकारला जातो़ यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे मत प्रगतीशील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केले़ सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे कांदा पिकाला विम्याचे संरक्षण द्यावे, कापूस पिकासाठी हप्ता कमी करावा, अशी मागणी कांदा उत्पादक विष्णुपंत घोलप यांनी केली आहे़ जिल्ह्यात २००८ मध्ये विदर्भापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या़ अशी वेळ येऊ नये यासाठी कांदा पिकाला तात्काळ विमा संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे़या संदर्भात तालुका कृषी अधिकारी व्ही़ एस़ बिनवडे म्हणाले की, शासकीय धोरणानुसार विमा हप्ता आकारला जातो़ शेतकऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांना कळविण्यात येईल़कांद्यालाही द्यावे विमा कवच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत असतानाही संरक्षण दिले जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूरउसाला जोखीम ८० टक्के व हप्ता ८ टक्के तर कपाशीला जोखीम ६० टक्के व हप्ता १३ टक्के़यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यावर दुजाभाव होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप