शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही कलेला जात, धर्म नसतो..!

By admin | Updated: September 4, 2015 00:25 IST

जालना : श्रींचे मनमोहक रुपडे, त्यांचे डोळे आणि लोभसपणा लहानपणीच भावला अन् इयत्ता चौथीला असतानाच पहिली गणेशाची मूर्ती मातीपासून तयार केली

जालना : श्रींचे मनमोहक रुपडे, त्यांचे डोळे आणि लोभसपणा लहानपणीच भावला अन् इयत्ता चौथीला असतानाच पहिली गणेशाची मूर्ती मातीपासून तयार केली. लहान वयापासून हा छंद जडला तो अजून कायम असल्याचे मूर्तीकार गुलाब पठाण सांगतात. कलेच्या प्रांतात जात, धर्म आणि पंथाला महत्त्व नसते. तेथे केवळ कला आणि साधना महत्त्वाची असते, असे ते आवर्जून सांगतात. गुलाब म्हणाले, माझे कुटुंब मूळचे नाशिक जिल्ह्यातील मनमाडचे. शाळेत शिक्षण घेत असताना गावात सार्वजनिक मंडळांतर्फे बसविण्यात ेयेणारी श्रींची मूर्ती पाहिली. तेव्हापासून आपणही श्रींची मूर्ती तयार करावी, असा विचार मनात आला. दुसऱ्याच दिवशी मातीपासून श्रींची मूर्ती तयार केली. तेंव्हा शाळेत शिक्षकांनी केलेले कौतूक आजही माझ्या स्मरणात आहे. घरच्या परिस्थितीमुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकलो. त्यानंतर श्रींची मूर्ती करण्याकडे माझा कल वाढला आणि तेव्हाच ठरवले की आता मूर्तीकार व्हायचे. २० वर्षांपूर्वी जालन्यात स्थायिक झालेले गुलाब पठाण यांची गणेशावर निस्सिम श्रद्धा आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी गुलाब हे जवळपास ६०० ते ७०० छोट्या आणि १५० मोठ्या मूर्ती तयार करतात. यासाठी मूर्ती आकर्षक आणि सुबक व्हाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असतो. रायगड जिल्ह्यातील पेण येथून काही मूर्ती ते आणतात. मात्र, यंदा पाणीटंचाईमुळे मूर्तींच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे गुलाब पठाण सांगतात. सद्यस्थितीत औरंगाबाद, परभणी आणि चिखली येथेही श्रींच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात असल्याने किमतीवर परिणाम जाणवत असल्याचे गुलाब पठाण म्हणाले. मोठी मूर्ती ५ ते २५ हजार रुपयांना, तर लहान मूर्ती ही ५५ ते ५०१ रुपयांदरम्यान असल्याचे गुलाब यांनी सांगितले. (प्रतिनिधी)