शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तालयातील अनेक पोलीस लाटत आहेत फुकटचा पगार!

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : कोणत्याही आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला सहा महिन्यांनंतर रुजू करून घ्यावे, असा एक नियम आहे;

औरंगाबाद : कोणत्याही आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला सहा महिन्यांनंतर रुजू करून घ्यावे, असा एक नियम आहे; परंतु औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात ४० पोलीस अधिकारी, कर्मचारी असे आहे की, ज्यांचे तीन- चार वर्षे उलटून गेले, तर अद्याप त्यांना रुजू करून घेण्यात आलेले नाही. हे ४० जण आयुक्तालयात येतात, सही मारतात अन् घरी निघून जातात. फक्त सही मारण्यासाठी त्यांना ७५ टक्के पगार देऊन पोसण्याचे काम पोलीस आयुक्तालयाकडून सुरू आहे. आजघडीला औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील फौजदार ते निरीक्षक दर्जाचे पाच अधिकारी आणि ३५ कर्मचारी, असे एकून ४० जण लाचेच्या आरोपाखाली निलंबित झालेले आहेत. मात्र, निलंबित होऊनही हे पोलीस मजाच मारताना दिसत आहेत. कारण आठवड्यातून एक, दोन वेळा पोलीस आयुक्तालयात यायचे, हजेरी रजिस्टरला आठवडाभराच्या सह्या मारायच्या आणि घरी निघून जायचे, असा या निलंबितांचा दिनक्रम सुरू आहे. काहीच न करता दरमहा या निलंबितांना ७५ टक्के वेतन मिळत आहे. नियमाला बगलनिलंबित करण्यात आलेल्या सरकारी नोकराला निलंबनाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ५० टक्के वेतन द्यावे आणि तीन महिन्यांनंतर ७५ टक्के वेतन द्यावे, त्यानंतर या निलंबिताला फुकट पोसण्याऐवजी सेवेत रुजू करून घ्यावे आणि ‘साईड पोस्टिंग’ द्यावी, असा एक नियम आहे. पोलीस खात्यात निलंबनाचा कालावधी सरासरी सहा महिने असतो. जास्तीत जास्त तो नऊ महिने करता येतो; परंतु त्यासाठी महासंचालकांची परवानगी घ्यावी लागते. औरंगाबाद आयुक्तालयात निलंबित असलेल्या चाळीसच्या चाळीस पोलिसांच्या निलंबनाचा कालावधी उलटून गेलेला आहे. काही जणांना तर निलंबित करून पावणेचार वर्षे होत आलेले आहे. अद्यापही त्यांना रुजू करू घेण्यात आलेले नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर गृह विभागाने या निलंबित कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे आदेश आयुक्तालयाला दिले होते, तरीही त्यांना रुजू करून घेण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने १९ सप्टेंबर १९८७ रोजी दिलेल्या अशाच एका प्रकरणात निकाल दिला होता. त्यात निलंबित पोलिसाला नियमबाह्यरीत्या कालावधीपेक्षा जास्त काळ निलंबित ठेवल्यामुळे निलंबनाच्या कालावधीतील संपूर्ण वेतन त्याला आदा करण्याचे आदेश न्यायालयाने गृहविभागाला दिले होते.