शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून मचाण विस्मृतीत तर राखणीतून गोफण हद्दपार; सुगीचे गीतेही कानी पडेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 17:32 IST

सकाळी, पहाटे किंवा दुपारनंतर शेताशेतातून भलरी गीताचे स्वर कानी पडत होते आणि लांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना शेतकरी या ठिकाणी सुगीचे काम करीत आहेत, याचा अंदाज येत असे.

गंगापूर : सध्या ज्वारी आणि गव्हाची सुगी सुरू आहे. सकाळी आणि संध्याकाळी शेतामध्ये ज्वारीची काढणी आणि गव्हाची कापणी करताना लोक पाहायला मिळत आहेत. अतिशय शांततेत त्यांचं हे काम सुरू आहे. मात्र पूर्वीप्रमाणे भलरी या गीताचे स्वर कानी पडत नाहीत. तसेच राखणीसाठी फटाक्यांचा अथवा एअरगनचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुगीतून भलरी आणि राखणीतून गोपणगुंडा हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. पीक काढणीच्या हंगामाला सुगी, असे म्हणतात. सुगीमध्ये लोकांना भरपूर श्रम करावे लागतात. या श्रमातून आनंद निर्माण करता यावा म्हणून पूर्वीचे लोक भलरी हे गीत गात होते. सकाळी, पहाटे किंवा दुपारनंतर शेताशेतातून भलरी गीताचे स्वर कानी पडत होते आणि लांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना शेतकरी या ठिकाणी सुगीचे काम करीत आहेत, याचा अंदाज येत असे. काळ बदलला आणि सर्व काही आधुनिक होऊ लागले. आता सकाळी लवकर ज्वारीची काढणी सुरू होत आहे. मात्र, राजकारण आणि इतर गप्पांचा त्यामध्ये भरणा जास्त आहे.

मचाण विस्मृतीत; अन्य वस्तूंचा वापरगोफण चालविण्यासाठी शेतामध्ये चार खांबांवर एक तात्पुरते छत तयार केले जाई. याला मचाण असे बोलले जात होते. यावर उभे राहून गोपणीतून दगड शेतामध्ये भिरकवले जात असत. मचाणावरून दगड फेकल्यावर तो दूरवर जात असल्याने पूर्वी शेताशेतात मचाण बांधलेले दिसे. आता मात्र फटाके आणि एअरगन यांचा मोठा आवाज असल्याने मचाण कोणीही बांधत नाही. मचाण पूर्णपणे विस्मृतीत गेले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर