शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:37 IST

या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी आई- वडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: चार मुले होते म्हणून जालना येथून ६ महिन्यापूर्वी दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय चिमुकल्या मुलीची आई व वडिलांनीच हातपाय मोडून, अंगावर चटके देऊन निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी पहाटे ३ वाजता सिल्लोड शहरातील मुगलपुरा भागात उघडकीस आली. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी आई- वडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत चिमुकलीचे नाव आयात फईम शेख असे आहे. तर फौजिया शेख फईम ( २७) आणि शेख फईम शेख आयुब ( ३५, वर्ष दोघे रा.अजिंठा हल्ली मुक्काम  मुगलपुरा, सिल्लोड) असे आरोपींची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अजिंठा येथून १५ दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात हे कुटुंब राहायला आले. तेव्हापासून या दोघांनी मिळून आयातचा मागील १५ दिवस अमानुष छळ केला. उपाशी ठेवत तिला चटके दिले. तसेच हातपाय पिरगाळून तोडले. त्यानंतर डोक्यात व पाठीत जोराने मारत तिला गंभीर जखमी केले. अमानुष मारहाण झालेल्या या चिमुकलीने अखेर गुरुवारी पहाटे ३ वाजच्या दरम्यान प्राण सोडले. 

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नअत्यंत निर्घृणपणे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने या निर्दयी मातापित्याने पहाटे ३ वाजता सिल्लोड येथील एका कब्रस्तानमध्ये परस्पर दफनविधी उरकण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी सिल्लोड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस अधीक्षक मयंक माधव,  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, फौजदार बी.एस. मुंढे, डी.आर. कायंदे यांनी घटनास्थळी जाऊन दफनविधी रोखला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी सिल्लोड शहरात पसरली. त्यानंतर नागरिकांनी रुग्णालय व पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

कारण अद्याप अस्पष्टपोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघा आईवडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. शोकाकुल वातावरणात सिल्लोड येथील कब्रस्तानमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता चिमुकलीची मूळ आई व हत्या करणाऱ्या आई वडिलांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. या घटनेमुळे सिल्लोड शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपी हे मूळचे अजिंठा येथील रहिवासी असून ते १५ दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात राहायला आले होते. सिल्लोड येथे आल्यापासून त्यांनी मुलीचा छळ सुरू केला होता. इतक्या निर्दयीपणे मारहाण करून, चटके देऊन खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सिल्लोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी