शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांनी मांडले तहसीलमध्ये ठाण

By admin | Updated: June 3, 2014 00:42 IST

पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकरी व निराधारांनी विविध न्याय मागण्यांसाठी तहसील कार्यालयात २ जून रोजी दुपारी १२ वाजता ठाण मांडून आंदोलन केले़

पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकरी व निराधारांनी विविध न्याय मागण्यांसाठी तहसील कार्यालयात २ जून रोजी दुपारी १२ वाजता ठाण मांडून आंदोलन केले़ तहसीलदार कैलास वाघमारे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे़ पालम तालुक्यातील खडी येथे संजय गांधी निराधार योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित आहेत़ या लाभार्थ्यांनी अनुदानाच्या यादीत नाव समाविष्ट करावे, यासाठी दोन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते़ परंतु, प्रशासनाकडून अजूनही अनुदानाच्या यादीत लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत़ यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत़ निराधारांच्या न्याय्य मागण्यांसाठी निराधार मंडळींनी तहसील कार्यालय गाठत कैफियत मांडली़ तसेच खडी येथील अनेक शेतकरी गारपिटीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ गारपिटीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ शासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून अनुदानासाठी पात्र शेतकर्‍यांच्या याद्या तयार केल्या आहेत़ या याद्यामध्ये अनेक शेतकर्‍यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत़ शेतकरी यामुळे अनुदानापासून दूर जाणार आहेत़ निसर्गाच्या संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांपुढे प्रशासनाने अडचणी निर्माण केल्या आहेत़ यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी निराधार मंडळींसह तहसील कार्यालयात ठाण मांडले़ मागण्या मान्य करेपर्यंत तहसीलदारांच्या कक्षामधून उठणार नसल्याचा इशारा देऊन आंदोलन सुरू करण्यात आले होते़ अखेर निराधार व शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनात उपसरपंच विशाल दादेवाड, सभापती श्रीकांत वाडेवाले, संदीप आळनुरे, एकनाथ दिवटे, शिवाजी अकनगिरे, भारत करंडे, माधव तिनाटे, उत्तम बोबडे, तुकाराम निळे, विठ्ठल खंदाडे आदींसह शेकडो निराधार व शेतकरी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)पालम तालुक्यात निराधारांवर यादीतून नावे वगळण्यात आल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे़ प्रशासकीय यंत्रणा हालचाली करीत नसल्याने पात्र असूनही लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत़ यामुळे गावोगावचे निराधार एकत्र येऊन तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांच्या कक्षात ठाण मांडण्याची ही दुसरी घटना आहे़ यापूर्वी पारवा येथील निराधारांनीही ठाण मांडून आक्रमक पवित्रा घेतला होता़ यामुळे शासकीय यंत्रणेने वेगवान हालचाली करीत पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याची गरज आहे़ पालम तालुक्यात तहसील कार्यालयाने सुक्ष्म तपासणीच्या नावाखाली गोरगरिबांवर अन्याय केलेला आहे़ अनेक पात्र लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहेत़ यामुळे गोरगरीब निराधार मंडळींना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे़ निराधार व वयोवृद्ध मंडळींनी तहसील कार्यालयात तक्रारी दिल्या आहेत़ परंतु, या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही़ यामुळे तहसील कार्यालय गाठत तालुक्यातील निराधार मंडळी आक्रमक होताना दिसत आहेत़