शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ रखडला!

By admin | Updated: November 27, 2014 01:09 IST

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय सिद्धार्थ उद्यान परिसरात बांधण्यात येत आहे.

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय सिद्धार्थ उद्यान परिसरात बांधण्यात येत आहे. त्याचे काम रखडल्यामुळे काल २५ रोजी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. पक्षनेते सुभाष देसाई यांना त्या संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काल २५ रोजी सांगितले होते. त्यावरून देसाई यांनी बुधवारी सायंकाळी काही स्थानिक नेत्यांना घेऊन संग्रहालयाच्या कामाची पाहणी केली. संग्रहालयाच्या कामामुळे आणि संघटनेतील गटबाजीमुळे आज समर्थनगर प्रचार कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवीत देसाई यांनी स्वत: त्या कामाचा आढावा घेतला.महापौर कला ओझा, सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे, गटनेते गजानन बारवाल यांच्यासह नगरसेवकांनी त्या कामाचा योग्य पाठपुरावा केलेला नाही, असा वरिष्ठ नेत्यांचा समज आहे. २०१० साली पक्षाने दिलेल्या वचननाम्यात त्या संग्रहालयाच्या कामाचा उल्लेख होता. २०१५ ची निवडणूक तोंडावर आली असून त्याचे काम अजून संपलेले नाही. त्यामुळे पक्षप्रमुख ठाकरे यांनी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.तीन वर्षांपासून संग्रहालयाचे काम सुरू असून सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. इतिहास संकलनाचे काम रखडले आहे. ५ कोटी रुपयांच्या आसपास त्या संग्रहालयाचा खर्च आहे. ४मराठवाड्यातील मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींचा ठेवा म्हणून ते संग्रहालय बांधण्याचा ठाकरेंचा संकल्प आहे. सैनिकांचा इतिहास, त्यांचे कार्य, छायाचित्रांसह तेथे भावी पिढीला पाहावयास मिळावा, हा त्या मागील उद्देश आहे. मनपाने स्वातंत्र्यसैनिकांबाबतचे साहित्य, माहिती संकलनासाठी आवाहन केले. त्यावरून काही स्वातंत्र्यसैनिकांनी मनपाशी संपर्क केला; परंतु पालिकेने काहीही प्रतिसाद दिला नाही.मनपाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंना फोन करून अवमान होत असल्याची भावना व्यक्त केली. एकतर संग्रहालयाच्या कामाला विलंब, त्यात स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान झाल्यामुळे ठाकरे संतापले.