शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबई महापालिकेतील टक्केवारीसाठी ठाकरे बंधू एकत्र!'; संजय शिरसाटांचा घणाघाती प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 14:26 IST

ज्यांचा जीव फक्त 'टक्केवारी'त अडकलाय, त्यांना जनतेची काय काळजी?

छत्रपती संभाजीनगर: "ज्या नेत्यांना नगरपालिकेत प्रचारासाठी फिरायला वेळ नव्हता, त्यांचा जीव आज मुंबईत का अडकला आहे? कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. केवळ टक्केवारीच्या स्वार्थासाठी आणि मजबुरीतून ही युती झाली आहे," अशा शब्दांत शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम? 
स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील युतीबाबत बोलताना शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. "उपमुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीचे स्पष्ट आदेश दिले आहेत, मात्र छत्रपती संभाजीनगरमधील काही लोकांना युती नको आहे असे दिसते. चार बैठका होऊनही काहींनी अवास्तव मागण्या केल्या आहेत. आज आम्ही अतुल सावे यांची भेट घेऊन अंतिम चर्चा करू, अन्यथा वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेतला जाईल. आम्हाला भांडण उकरून काढायचे नाही, म्हणूनच आम्ही आजवर शांत आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.

खैरे आणि दानवेंवर टीकास्त्र
संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा समाचार घेताना अत्यंत तिखट शब्द वापरले. "ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना उभी राहिली, त्याच पक्षात आता कुणाला तरी जपण्यासाठी 'मामू' होण्याची वेळ आली आहे. अनेकजण आज उबाठा सोडण्याच्या तयारीत आहेत. अंबादास दानवे ज्या एमआयएमच्या मतांवर बोलत आहेत, त्यांनी विचार करावा की अब्दुल सत्तार जेव्हा धनुष्यबाणासाठी लढले, तेव्हा तुमची भूमिका काय होती? आता तुमच्या डब्याला कुलूप लावण्याची वेळ आली आहे," असे शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरेंची गल्लीत सभा घेण्याची वेळ! 
मैदान बुकिंग आणि सभांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. "मैदानं बुक करून तिथे लोकं तरी आणा. आता गल्लीत सभा घेण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. आम्ही काय करायचं हे आम्हाला चांगलं कळतं, म्हणूनच आमचा पक्ष पुढे चाललाय. तुमचा डबा रुळावरून घसरला असून आता फक्त काठावर बसून पाहण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय उरलेला नाही," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Brothers Unite for Mumbai Corporation's Percentage: Shirsat's Sharp Attack

Web Summary : Sanjay Shirsat accuses Thackeray brothers of uniting for Mumbai's corporation profits. He criticized Uddhav Thackeray's declining influence and questioned Ambadas Danve's stance on Hindutva and MIM support while expressing confidence in Shinde's leadership.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे