शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यानंतर तणाव

By admin | Updated: June 14, 2016 00:08 IST

वाळूज महानगर : बकवालनगरात रविवारी रात्री एका ३५ वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज महानगर : बकवालनगरात रविवारी रात्री एका ३५ वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांना अटक करण्यात यावी, यासाठी संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गर्दी केली होती. रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शेख अकबर याने सय्यद जुनैद (३५, रा. अजवानगर, वाळूज) यांना मोबाईलवर संपर्क साधून सांगितले की, तुझ्या भावाची आॅटोरिक्षा दिनेश कर्डिले व त्यांच्या साथीदारांनी बकवालनगरात अडवून ठेवली आहे. त्यामुळे जुनैद बकवालनगरात गेला. भावाची रिक्षा दिसल्यामुळे ते रिक्षा आणण्यासाठी चालले असताना दिनेश कर्डिले, रमेश अरगडे व त्यांच्या दोघा भावांनी अन्य तीन साथीदारांच्या मदतीने अंधारात जुनैदवर हल्ला केला. जुनैद यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींनी बकवालनगरात जाऊन जुनैद यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात गर्दी करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. वाळूज पोलिसांनी जमावाची समजूत काढत हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे जमाव शांत झाला. यानंतर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक जारवाल यांनी गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काकासाहेब चापे, माजी उपसरपंच खालेद पठाण, चाँद पटेल आदींनी जमावाची समजूत काढल्यामुळे वातावरण निवळले. या हल्लाप्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जारवाल करीत आहेत. जुनैद व दिनेश यांच्यात जुना वाद आहे. चार ते पाच वर्षांपूर्वीच्या योगेश जोशी खूनप्रकरणी जुनैद मुख्य आरोपी आहे. योगेश टोळीतील दिनेश व सय्यद जुनैद यांच्यात वैमनस्य आहे. या वादावरूनच कर्डिले याने जुनैदवर हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. रमेश अरगडे हा वाळूमाफिया असून, दिनेशविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, बकवालनगरात वेश्या व्यवसाय चालविण्यावरून ही हाणामारी झाल्याचा तक्रार अर्ज नागरिकांच्या वतीने वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.