शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे वेतन आता ‘आॅनलाइन’!

By admin | Updated: May 16, 2014 03:18 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे मासिक वेतन यापुढे आॅनलाइन होईल़

संजय तिपाले, बीड - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे मासिक वेतन यापुढे आॅनलाइन होईल़ शिक्षण विभागाच्या शालार्थ योजनेअंतर्गत जून महिन्यांपासून वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे़ जिल्ह्यातील १० हजार शिक्षकांना याचा लाभ होणार आहे़ जिल्हा परिषदेच्या २ हजार २२३ प्राथमिक, तर ५६ माध्यमिक शाळा आहेत़ याशिवाय खासगी प्राथमिक ११५, तर माध्यमिक खासगी शाळांची संख्या ९८ इतकी आहे़ जिल्हा परिषदेत ८ हजार ७६४ शिक्षक कार्यरत आहेत़ खासगी शाळांचे शिक्षक मिळून हा आकडा दहा हजारावर जातो़ आतापर्यंत वेतनाचे बिल मुख्याध्यापकांकडून गटशिक्षणाधिकार्‍यांकडे येत होते़ त्यानंतर शिक्षण विभागातून ते मंजूर होत असे़ या सर्व प्रक्रियेत वेळ जात होता़ त्यामुळे अनेकदा वेतन हातात पडण्यास विलंब होत होता़ शिक्षकांचे वेतन त्यांना विनाविलंब मिळावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने शालार्थ योजना राबविण्यात आली़ त्यानुसार आता शिक्षकांचे वेतन आॅनलाइन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे़ शासनाकडून वेतनाची रक्कम आल्यावर ती आॅनलाईन गटशिक्षणाधिकार्‍यांच्या खात्यात जमा होईल़ ते वेतनाची रक्कम प्रमाणित करतील़ त्यानंतर वेतन थेट शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे़ आॅनलाइन वेतनासाठी जि़प़च्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून आवश्यक ती माहिती शासनाला कळविण्यात येत आहे़ त्यानंतर शाळेला विशिष्ट कोड क्रमांक दिला जातो़ शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, पॅन कार्ड, आधार कार्ड, एकूण पदमान्यता, सध्या कार्यरत शिक्षकांची संख्या, नावे, त्यांची शैक्षणिक पात्रता, छायाचित्रे, सर्व्हिस बुक आदी माहिती भरून देणे आवश्यक आहे़