ग्रंथोत्सवात शिक्षक साहित्यिकांना डावलले

By Admin | Updated: February 20, 2015 00:10 IST2015-02-19T23:35:55+5:302015-02-20T00:10:53+5:30

बीड : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत २० ते २२ फेबु्रवारीदरम्यान होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवात माध्यमिक विभागाने साहित्याशी निगडीत शिक्षकांनाच डावलले आहे.

Teachers in the bookstore were inspired by literary writers | ग्रंथोत्सवात शिक्षक साहित्यिकांना डावलले

ग्रंथोत्सवात शिक्षक साहित्यिकांना डावलले


बीड : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत २० ते २२ फेबु्रवारीदरम्यान होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवात माध्यमिक विभागाने साहित्याशी निगडीत शिक्षकांनाच डावलले आहे. त्यामुळे गं्रथोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
जि.प. च्या माध्यमिक विभागामार्फत या गं्रथोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवासाठी शिक्षकांमधीलच साहित्यिकांना निमंत्रण अपेक्षित होते;परंतु नेमके त्यांनाच डच्चू दिला आहे. जि.प. मधील काही शिक्षकांनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक आदी साहित्य परंपरा जपलेली आहे. जिल्ह्याबाहेर या शिक्षकांच्या साहित्याचे कौतूक होत असताना शिक्षण विभागाने त्यांनाच गं्रथोत्सवात स्थान न दिल्याने नवाच वाद निर्माण झाला आहे. स्थानिकांना डावलून होत असलेल्या या गं्रथोत्सवासाठी माध्यमिक शिक्षा अभियानाकडून एक लाख ६० हजार रुपये इतका निधी आलेला आहे. या निधीतून ग्रंथोत्सव कमी अन् अनुदानोत्सव जादा दिसत असल्याचा आरोप शिक्षक साहित्यिकांनी पत्रकाद्वारे केला आहे.
शिक्षणाधिकारी (मा.) लता सानप यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे म्हणाले, खोडसाळपणातून अशा प्रकारचे पत्रक काढले असावे. कोणाला डावलण्याचा प्रश्न नाही. सर्व शाळांना निमंत्रण पाठविले आहे. पुस्तक विक्रीसाठी १६ स्टॉल लावले आहेत. त्यासाठी शुल्क घेतले जाणार नाही. आरोप धादांत खोटे आहेत. चांगल्या कामात अडथळे नको.

Web Title: Teachers in the bookstore were inspired by literary writers