लातुरात आजपासून शिक्षक साहित्य संमेलन

By Admin | Updated: February 1, 2015 00:47 IST2015-02-01T00:47:47+5:302015-02-01T00:47:47+5:30

लातूर : शिक्षक प्रतिनिधी सभा (शिक्षक काँग्रेस), मराठवाडा साहित्य परिषद, संस्थाचालक संघटनेच्या वतीने लातुरात दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य

Teacher literary meet today in Latur | लातुरात आजपासून शिक्षक साहित्य संमेलन

लातुरात आजपासून शिक्षक साहित्य संमेलन


लातूर : शिक्षक प्रतिनिधी सभा (शिक्षक काँग्रेस), मराठवाडा साहित्य परिषद, संस्थाचालक संघटनेच्या वतीने लातुरात दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन आजपासून सुरू होत आहे़ येथील दयानंद सभागृहात रविवारी दुपारी १२ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे़
सकाळी ९़३० वाजता ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन होणार आहे़ दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ सोमवारी सायंकाळी ५ वाजता शिबिराचा समारोप होणार आहे़ संमेलनात विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़ पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे़ संमेलनात दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी झाली आहे़ (प्रतिनिधी)
शिक्षक साहित्य संमेलनात विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे़ माध्यमिक व प्राथमिक गटातील प्रत्येकी १० असे एकूण २०, लातूर शहर विभागातील १३ शिक्षकांचा गौरव होणार आहे़ तसेच विद्याधर कांदे-पाटील, अजयकुमार बोराडे पाटील यांचा विशेष पुरस्काराने गौरव होणार आहे़
४पारू नगर, नागोबावाडी, वळसांगवी, होनाळी, करखेली, जळकोट, सताळा, आष्टा, भोजराज नगर, सुमठाणा येथील जिल्हा परिषद शाळांना विलासराव देशमुख आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार आहे़ १० तालुक्यातील १० शाळा आहेत़

Web Title: Teacher literary meet today in Latur