शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनानेच करा

By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T23:25:49+5:302014-07-25T00:28:08+5:30

बीड: माध्यमिक शिक्षकांच्या प्रशासकीय तसेच विनंती बदल्या करण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली होती.

Teacher changes are done by counseling | शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनानेच करा

शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनानेच करा

बीड: माध्यमिक शिक्षकांच्या प्रशासकीय तसेच विनंती बदल्या करण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली होती. याउपरही काही आदेश परस्पर निघाले. त्यामुळे समुपदेशनानुसारच बदल्या कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने केली आहे.
२१ मे २०१४ रोजी शिक्षण विभागात समुपदेशनाची प्रकिया पार पडली. त्यानंतर बदल्यांचे आदेश निघायला हवे होते; पण ते काढले नाहीत. त्यामुळे समुपदेशनाने बदलीस पात्र ठरलेल्या पात्र माध्यमिक शिक्षकांवर अन्याय झाला. बदल्या रद्द केल्या असल्या तरी यात अनियमितता करणाऱ्यांविरुद्ध कुठलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिगंबर गंगाधरे, जिल्हा सरचिटणीस हरिश्चंद्र विद्यागर, मोतीराम वाघमारे, विकास वाघमारे, अभय कांबळे, प्रा. रवींद्र वंजारे, संपत साळवे, विष्णू सोनवणे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher changes are done by counseling