टीडीआर घोटाळाप्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यासह कारकूनाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 08:00 PM2018-12-05T20:00:57+5:302018-12-05T20:01:53+5:30

या कारवाईने महापालिकेत खळबळ उडाली असून याप्रकरणाशी संबंधित अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

TDP scandal involves arrest of clerk and engineer | टीडीआर घोटाळाप्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यासह कारकूनाला अटक

टीडीआर घोटाळाप्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यासह कारकूनाला अटक

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेतील बहुचर्चित टिडीआर घोटाळा प्रकरणात महापालिकेचा  शाखा अभियंता आणि आवक-जावक कारकुनाला आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनीअटक केली. या कारवाईने महापालिकेत खळबळ उडाली असून याप्रकरणाशी संबंधित अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शाखा अभियंता शिवदास भग्गू राठोड (वय ५२,रा. ज्ञानेश्वरनगर , गारखेडा) आणि  कारकून मजहर अली महंमद अली (वय ५०,रा. जुनाबाजार)अशी अटकेतील आरोेपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, १९७५मध्ये मंजूर झालेल्या शहर विकास आाराखड्यानुसार शहागंज येथी गांधी पुतळा ते मंजूरपुरा-लोटाकारंजा आणि त्यापुढील लेबर कॉलनी ते विश्वासनगरपर्यंतच्या पंधरा मिटर रस्त्याचे रुंदीकरण करताना मनपाने मंजूरपुरा येथील इमारतीचे १४४ . ८० चौरस मिटर क्षेत्र संपादित केले होते.

या क्षेत्राचा मोबदला म्हणून मनपाकडून मोहंमद अब्दुल साजेद मोहंमद अब्दुल सत्तार यांना ८ लाख २५ हजार रुपये अदा करण्यात आले होते. अब्दुल साजेद यांचे वारसदार त्यांची पत्नी आणि इतरांचे जीपीएधारक (आममुख्त्यार)अब्दुल सिकंदर याने कट रचून त्याच इमारतीचा टीडीआर स्वरुपात मोबदला मागणारा अर्ज मनपाकडे सादर केला होता.  या प्रस्तावासोबत सिकंदरने सादर केलेली कागदपत्रे बनावट आहे. शिवाय आधी मोबदला घेतलेला असताना पुन्हा त्याच संपत्तीसंदर्भात मोबदला मागून महापालिकेची फसवणुक केली जात असल्याचे तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या लक्षात येताच त्यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाखा अभियंता प्रभाकर पाठक यांच्यातक्रारीवरुन सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहे.  या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी महिनाभरापूर्वीच मुख्य आरोपी अब्दुल सिकंदरला अटक केली होती. या अटकेनंतर पोलिसांनी त्यांचा मोर्चा मनपाकडे वळविला. सिकंदरच्या फाईलशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी  गत सप्ताहात चौकशीसाठी बोलावले होते. चार अधिकारी आणि एका कारकुनाची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवून घेतले होते. शाखा अभियंता राठोड आणि कारकून मजहर यांनी आरोपींकडून कोरा अर्ज स्विकारून त्यावर आक्षेप न घेता पुढे पाठविल्याचे समोर आल्याने त्यांना बुधवारी दुपारी अटक करण्यात आली.

Web Title: TDP scandal involves arrest of clerk and engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.