शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

तरूणास फासाच्या गंजीवर जाळले

By admin | Updated: July 3, 2014 00:21 IST

रोहिलागड : अंबड तालुक्यातील किनगाव शिवारात गट नं. २७२ मध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात तरूणास फासाच्या गंजीवर जाळण्यात आले.

रोहिलागड : अंबड तालुक्यातील किनगाव शिवारात गट नं. २७२ मध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात तरूणास फासाच्या गंजीवर जाळण्यात आले. अंबड - रोहिलागड मार्गावर किनगाव शिवारात ही घटना घडली. सदर इसमाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षाचे आहे. सदर इसमाला गाडीत आणून रोड लगतच असलेल्या पळाट्याच्या फासाच्या गंजीवर टाकण्यात आले असावे व नंतर त्या फासाच्या गंजीला आग लावण्यात आली असावी असा अंदाज आहे. आगीचा लोळ उंच असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आगीच्या दिशेने धाव घेतली. मात्र तिथे त्या गंजीवर सदर इसमाचे प्रेत जळताना दिसले.त्यामुळे त्यांनी किनगाव इथे जावून पोलीस पाटलांनी दूरध्वनीद्वारे अंबड पोलीस ठाण्यात कळविले. नंतर अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगिर, स.पो.उप.नि. आबासाहेब देशमुख, पोहेकॉ वनारसे, मुकुंद चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन या घटनेचा पंचनामा केला.प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी अंबड येथील शासकीय रूग्णालयात हलविले आहे. अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)