लाच प्रकरणातील तलाठी फरार

By Admin | Updated: August 17, 2015 01:06 IST2015-08-17T00:30:40+5:302015-08-17T01:06:30+5:30

आष्टी : तालुक्यातील पांढरी येथे लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा नोंद झाला होता तर त्याने नेमलेला दलाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला होता.

Talathi absconding in bribe case | लाच प्रकरणातील तलाठी फरार

लाच प्रकरणातील तलाठी फरार


आष्टी : तालुक्यातील पांढरी येथे लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा नोंद झाला होता तर त्याने नेमलेला दलाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला होता. दोन दिवस उलटले तरीही तलाठी पोलिसांना सापडला नाही.
पांढरी सज्जाचे तलाठी सय्यद खदीर खुदबुद्दीन यांनी सालेवाडी येथील शेतकऱ्याकडे दहा हजारांची लाच फोनवरून मागितली होती. सातबारावर चुलत बहिणीचे नाव लावताना झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी दहा हजार रूपये मागितल्यानंतर सदरील शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. शुक्रवारी सापळा लावून तलाठ्याने नेमलेल्या लक्ष्मण गोविंद झगडे (रा. सालेवाडी) या दलालास दहा हजार रूपयांची लाच घेताना आंबेडकर चौकातील एका दुकानासमोर पकडले होते. तलाठी सय्यद फरार असून, पोलिसांना हुलकावणी देत आहे. (वार्ताहर)

Web Title: Talathi absconding in bribe case