रेल्वेत फिरवली तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:13 IST2017-10-08T00:13:34+5:302017-10-08T00:13:34+5:30

प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसच्या बोगीत एकाने अडीच फूट तलवार फिरविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी औरंगाबाद ते दौलताबाददरम्यान घडली.

Sword swing in railway | रेल्वेत फिरवली तलवार

रेल्वेत फिरवली तलवार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसच्या बोगीत एकाने अडीच फूट तलवार फिरविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी औरंगाबाद ते दौलताबाददरम्यान घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये दहशत पसरली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली.
जसपालसिंग दर्शनसिंग (२७, रा. जारखेलन खेरी, फत्तेहगड साहेब, पंजाब) व हरदीपसिंग चरणसिंग (३७, रा. कोटला विजवाडा, मन्नुपूर, फत्तेहगड साहेब, पंजाब) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस ही शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास औरंगाबादहून रवाना झाली. ही रेल्वे दौलताबादजवळ असताना रेल्वेतील डी-२ बोगीत एकाने अचानक तलवार फिरवीत प्रवाशांना धक्काबुक्की केली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. या घटनेने बोगीत एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मनमाड लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. ही रेल्वे मनमाड येथे पोहोचताच दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सतीश सराफ (रा. सिल्कमिलकॉलनी) यांनी फिर्याद नोंदविली असून, शुक्रवारी रात्री या दोघांना औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या दोघांकडून एक तलावर आणि कुºहाड जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिर्झा अन्वर बेग करीत आहेत. तलवार नेमक्या कोणत्या कारणामुळे उगारली, याची पोलिसांत नोंद नाही; परंतु जागेच्या वादातून ही घटना झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

Web Title: Sword swing in railway