शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

'दुखवटा संपण्याआधीच शपथविधी, माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व'; संजय शिरसाट यांनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 14:01 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांवर अंत्यसंस्कार होऊन अवघे ४ दिवस उलटत नाही, तोच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांवर अंत्यसंस्कार होऊन अवघे ४ दिवस उलटत नाही, तोच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “दुखवटा संपण्याआधीच शपथविधी होतोय. राजकारणात माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व दिलं जात असल्याचं दिसतं,” अशी भावना त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

सुनेत्रा पवारांचा शपथविधी, शरद पवारांना निमंत्रण का नाही?; गिरीश महाजन म्हणाले, "एकत्र होण्यासारखं..."

अजित पवार यांच्या निधनानंतर इतक्या वेगाने घडामोडी घडतील, अशी अपेक्षा नव्हती, असं शिरसाट म्हणाले. “काही कालावधीनंतर हालचाली होतील असं वाटत होतं. मात्र इतक्या तातडीने घडामोडी, सुनेत्रा पवार यांचं मुंबईला जाणं आणि नेत्यांची वक्तव्यं येणं.हे अनपेक्षित होतं,” असं त्यांनी सांगितलं. आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगत, “सर्व विषयांचा लवकरच निपटारा होईल. पण एवढ्या घाईने शपथविधी घेण्याची गरज नव्हती; आठ दिवसांनी घेतला असता. कुठली भीती त्यांना सतावत होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शपथविधीची घाई का?

“अलीकडच्या घडामोडींवरून असं वाटतं की माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. दुखवटा संपण्याआधी शपथविधी होणं हे योग्य नव्हतं. ही सर्वसामान्यांची भावना आहे. तीच मी व्यक्त करतोय,” असं शिरसाट म्हणाले.

“अजित पवार हे राष्ट्रवादीचे मुख्य नेते होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सामूहिक निर्णयांचा काळ सुरू असल्याचं दिसतं. त्यामुळेच शरद पवार यांनी ‘खंड पडेल’ असं सूचक वक्तव्य केलं असावं. या घडामोडींमध्ये शरद पवारांना कितपत माहिती होती, हे सांगणं कठीण आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

“देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका हीच आमची भूमिका आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा. आम्ही विरोध करणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विचार त्यांचा होता. यात भाजपचे संबंध नाहीत. ते घडलं असतं तर ते एनडीए महायुतीत आले असते,” असेही शिरसाट म्हणाले.

राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वाबाबत, “पवार कुटुंबातील व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष होईल, असं निश्चित मानलं जात आहे,” असं त्यांनी सांगितलं. स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकांतील आरोपांवर ते म्हणाले, “भाजपने काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. पण स्थानिक नेते इतक्या सफाईने खोटं बोलतील यावर विश्वास बसत नाही. आम्हाला बोलायला लावू नका. अन्यथा वरिष्ठांकडे तक्रारी मांडू.”

लाडकी बहीण योजना

“लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही हे सर्व नेत्यांनी स्पष्ट केलं आहे,” असंही शिरसाट यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Oath before mourning ends: Chair more important than person, says Shirsat.

Web Summary : Sanjay Shirsat criticizes Sunetra Pawar's swift oath-taking as Deputy CM after Ajit Pawar's death. He questions the rush, suggesting the chair is prioritized over respect for mourning, reflecting public sentiment. He also touched on potential shifts in NCP leadership.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटAjit Pawarअजित पवार