बोधवड यांच्या बदलीस ‘मॅट’ची स्थगिती

By Admin | Updated: June 19, 2014 00:20 IST2014-06-19T00:04:49+5:302014-06-19T00:20:11+5:30

हिंगोली : जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या जालना येथे झालेल्या बदलीला महाराष्ट्र न्यायाधिकरण (मॅट) औरंगाबादने स्थगिती दिली असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.

Suspension of Bats 'Badas' Matt | बोधवड यांच्या बदलीस ‘मॅट’ची स्थगिती

बोधवड यांच्या बदलीस ‘मॅट’ची स्थगिती

हिंगोली : जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या जालना येथे झालेल्या बदलीला महाराष्ट्र न्यायाधिकरण (मॅट) औरंगाबादने स्थगिती दिली असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांची काही दिवसांपूर्वी जालना येथे बदली झाली होती. त्यांच्या जागेवर उदगीर येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर बोधवड यांच्या बदलीला वरिष्ठ पातळीवरून स्थगिती देण्यात आली.
त्यानंतर पुन्हा विभागीय आयुक्तांनी ही स्थगिती उठवून बोधवड यांना जालना येथे तर लतीफ पठाण यांना हिंगोली येथे तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले होते. आठ महिन्यातच बोधवड यांची बदली झाल्याने त्यांनी या विरोधात औरंगाबाद येथील महाराष्ट्र न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. त्यानुसार न्यायाधिकरणाने बोधवड यांच्या बदलीस स्थगिती दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांची जालना येथे बदली झाल्यानंतर त्यांनी या बदलीविरोधात औरंगाबाद येथील महाराष्ट्र न्यायाधिकरणामध्ये घेतली होती धाव.

Web Title: Suspension of Bats 'Badas' Matt