‘सर्वोपचार’मध्ये संशयित दाखल

By Admin | Updated: February 3, 2015 00:58 IST2015-02-03T00:32:42+5:302015-02-03T00:58:58+5:30

लातूर : लातूर येथील शासकीय सर्वोपचार रूग्णालयात स्वाईन फ्ल्यू संशयित एक रुग्ण सोमवारी दाखल झाला आहे़ त्याला ताप, सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास असल्याने

The suspect is lodged in 'Soma Aap'char' | ‘सर्वोपचार’मध्ये संशयित दाखल

‘सर्वोपचार’मध्ये संशयित दाखल


लातूर : लातूर येथील शासकीय सर्वोपचार रूग्णालयात स्वाईन फ्ल्यू संशयित एक रुग्ण सोमवारी दाखल झाला आहे़ त्याला ताप, सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास असल्याने उपचारासाठी सर्वोपचारमधील आयसोलेटेड वार्डात दाखल करण्यात आले आहे़ शिवाय, एका खाजगी रुग्णालयातही स्वाईन फ्ल्यूने गंभीर असलेल्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. आता सीमा भागात हे लोण पसरले असून, एका २४ वर्षीय महिलेला बीदरमध्ये स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात असलेल्या आयसोलेटेड वार्डात चाकूर येथील एक संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे़ त्या रूग्णांवर योग्य ते उपचार सुरू असल्याचे रूग्णालय सूत्रांनी सांगितले़ शिवाय, दोन दिवसांपूर्वी लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूने गंभीर असलेला रुग्ण दाखल आहे. त्याच्यावर यशस्वी उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.
बीदर येथील एक २४ वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी हैद्राबादला गेली होती़ तिथे ती खरेदीसाठी वर्दळीच्या बाजारपेठेत फिरली़ चार दिवसांपूर्वी ही महिला बीदरला परत आल्यानंतर तिला फणफणून ताप भरला़ उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रक्त व थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात ती एच१एन१ या विषाणू संसर्गाने बाधित असल्याचे म्हटले आहे़ त्यास आरोग्य विभागानेही दुजोरा दिला आहे़
या अहवालानंतर विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी तातडीने आरोग्य विभागाने संबंधित रुग्ण महिलेस तिच्या घरी हलविले असून, आवश्यक उपचार व काळजी घरातच घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
स्वाईन फ्ल्यूचा ‘एच-१ एन-१’ व्हायरस लातूर जिल्हा व परिसरात सक्रिय झाला आहे. शेजारील बीदर जिल्ह्यातही या साथीचे लोण पसरले असून, आरोग्य अधिकाऱ्याच्या एका २४ वर्षीय मुलीला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे़ तिच्यावर बीदरमध्ये शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़

Web Title: The suspect is lodged in 'Soma Aap'char'