शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त गावांचे आजपासून सर्वेक्षण

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

नांदेड: निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावांच्या शाश्वता तपासणीसाठी जिल्ह्यातील १८ गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे़

नांदेड: निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावांच्या शाश्वता तपासणीसाठी जिल्ह्यातील १८ गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे़ आजतागायत राज्यातील ९ हजार ५२३ ग्राम पंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे़ जिल्ह्यातील १६९ ग्राम पंचायतींना हा पुरस्कार मिळाला आहे़ यात अर्धापूर तालुक्यातील ८ ग्राम पंचायती, भोकर-१५, बिलोली-९, देगलूर-२, धर्माबाद-४, हदगाव-१३, हिमायतनगर-१३, कंधार-१३, किनवट -१४, लोहा-१३, माहूर-१०, मुदखेड-२५, मुखेड-४, नायगाव-७, नांदेड-१०, उमरी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे़ सध्या ही गावे स्वच्छतेत शाश्वत आहेत अथवा नाही़ त्यांच्या सवयीत झालेला बदल याबाबत यंत्रणेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे़ यात नांदेड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे़ दिल्ली येथील ९ सदस्यीय शिष्टमंडळ या गावात १३ सप्टेंबरपासून भेट देणार आहे़ या गावांचे होणार सर्वेक्षणमाहूर तालुक्यातील महादापूर, अर्धापूर तालुक्यातील दाभड, भोकर-पांडूर्णा, बोरवाडी, बिलोली-खतगाव, धर्माबाद-पाटोदा खू़ व येवती, हदगाव-रुई, हिमायतनगर-पार्डी, कंधार-बहाद्दरपूरा, मुदखेड-वरदडा तांडा, रोहिपिंपळगाव तांडा, तिरकसवाडी, वैजापूर पार्डी व पिंपळकौठा मगरे, मुखेड-पांडूर्णी, उमरी तालुक्यातील शेलगाव व जिरोणा या ग्राम पंचायतीची तपासणी होणार आहे़ चालू वर्षात जिल्ह्यातील ७४ ग्राम पंचायती निर्मल करण्यात येणार असून स्वच्छतेच्या व्याप्तीसाठी नरेगा आणि निर्मल भारत अभियान कक्षाच्या अभिसरणातून शौचालय बांधण्यात येणार आहेत़