शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी सुरेखा महाजन

By admin | Updated: July 5, 2014 01:03 IST

औरंगाबाद : साठ महिला सदस्य असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेखा महाजन या निवडून आल्या.

औरंगाबाद : साठ महिला सदस्य असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेखा महाजन या निवडून आल्या. ९४६ नोंदणीकृत सदस्य असलेल्या वकील संघाच्या निवडणुकीत तिन्ही उमेदवार महिलाच होत्या, त्यामुळे संपूर्ण न्याययंत्रणेचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाची २०१४-१५ यावर्षाची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी शुक्रवारी ऐतिहासिक निवडणूक झाली. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी वैशाली शिंदे-मोरे यांनी सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजय संपादन केला.वकील संघाची कार्यकारिणी निवडण्यासाठी दरवर्षी निवडणूक होत असते. विशेष म्हणजे खंडपीठ वकील संघात कार्यरत असलेल्या महिलांना अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळावी, यासाठी चार वर्षांतून एकदा अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय सहा वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी करण्यात आली. वकील संघाची २०१४-१५ यावर्षाची कार्यकारिणी निवडण्यासाठी आज मतदान झाले. ही निवडणूक अटीतटीची; परंतु उत्साहात पार पडली. सहा वर्षांपूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी खंडपीठ वकील संघात कार्यरत असलेल्या महिलांना अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळावी, यासाठी चार वर्षांतून एकदा अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय सहा वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी करण्यात आली. या निवडणुकीत अ‍ॅड. प्रदीप पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.उत्साहात मतदान खंडपीठातील हॉलमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. साडेनऊशे सदस्य असलेल्या या संघाच्या ७०० सदस्यांनी दुपारी २ वाजेपर्यंत मतदान केले. तर शेवटच्या एका तासात १७० वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक लढविणारे उमेदवार मतदान कक्षाबाहेर उभे राहून मतदारांना स्मितहास्य करून अभिवादन करीत होते. अनेक मतदार मतदान करून आल्यानंतर उमेदवारांना भेटून तुम्हाला मतदान करून आलो असे सांगत.ज्युनिअर वकिलांचे प्रश्न मार्गी लावणार पुरुषप्रधान व्यवसाय म्हणून वकिली व्यवसायाकडे पाहिले जाते. खंडपीठात वकिली करणाऱ्या महिलांची संख्या कमी असली तरी सर्वजणी सक्षमपणे हा व्यवसाय करीत आहेत. पहिली महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळाल्याने आनंद वाटतो. आपल्या कार्यकाळात ज्युनिअर वकिलांच्या समस्या, वकिलांच्या चेंबरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहणार आहे.- अ‍ॅड. सुरेखा महाजन, नवनिर्वाचित अध्यक्ष