भोंदूबाबाच्या अटकेसाठी रास्ता रोकोचा इशारा

By Admin | Updated: June 17, 2014 01:13 IST2014-06-17T00:35:26+5:302014-06-17T01:13:19+5:30

येरमाळा : एकनाथ सुभाष लोमटे या भोंदूविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप अटक नाही.

Stop the road to the bewilderment's arrest | भोंदूबाबाच्या अटकेसाठी रास्ता रोकोचा इशारा

भोंदूबाबाच्या अटकेसाठी रास्ता रोकोचा इशारा

येरमाळा : अंधश्रध्देला खतपाणी घालून भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या मलकापूर (ताक़ळंब) येथील एकनाथ सुभाष लोमटे या भोंदू महाराजाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप त्यास अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे २१ जून रोजी येरमाळा चौरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील-खंडापूरकर यांनी दिला आहे.
मलकापूर येथील एकनाथ महाराज लोमटे यांच्याविरूध्द १८ मार्च २०१४ रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील-खंडापूरकर, शिवाजी गिड्डे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती़ तक्रारीत महाराज हा कुठल्याही रोगावर खात्रीशीर उपचार म्हणून जडीबुटी, बुक्का, लिंबू-नारळ, बिबा, मिरची अशा वस्तू देऊन पैसे घेत भोंदूगिरी करून नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचे म्हटले होते़ यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समितीमार्फत चौकशी केल्यानंतर १२ जून रोजी मंडळ अधिकारी भारत एकनाथ ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ट जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
असे असतानाही येरमळा पोलिसांकडून मात्र या भोंदू महाराजास अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप खंडापूरकर यांनी केला आहे. दरम्यान, २० जूनपर्यंत अटक नाही झाल्यास २१ जून रोजी येरमाळा चौरस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशाराही खंडापूरकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे. याबाबत फौजदार डी. जी. अहंकार यांच्याशी संपर्क साधला असता तपास चालू असून, लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Stop the road to the bewilderment's arrest