भ्रष्टाचार थांबवा, लोकाभिमुख कामे करा

By Admin | Updated: November 16, 2015 00:40 IST2015-11-15T23:33:54+5:302015-11-16T00:40:03+5:30

बीड : विकासात्मक बदल करण्यासाठी भ्रष्टाचार थांबवून लोकाभिमुख कामे करा, असे आवाहन शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी रविवारी केले.

Stop corruption, make people oriented works | भ्रष्टाचार थांबवा, लोकाभिमुख कामे करा

भ्रष्टाचार थांबवा, लोकाभिमुख कामे करा


बीड : विकासात्मक बदल करण्यासाठी भ्रष्टाचार थांबवून लोकाभिमुख कामे करा, असे आवाहन शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी रविवारी केले.
शिवसंग्राम भवनाच्या प्रांगणात आयोजित स्रेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष दिलीप गोरे, माजी आ. आदिनाथ नवले, डॉ. रमेश पानसंबळ, प्रभाकर कोलंगडे, माजी प्राचार्य पी. बी. सावंत, सुहास पाटील, मनोज जाधव, जयसिंग चुंगडे, अशोक लोढा, नितीन लोढा, सुभाष सपकाळ आदी उपस्थित होते.
यावेळी मेटे यांनी सांगितले की, राशन दुकानातून वितरित होणाऱ्या धान्यामध्ये, एमआरईजीएसच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार समोर येत आहे. शासन योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पारदर्शकपणे पध्दतीने पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग रहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
शहराच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Stop corruption, make people oriented works