मनपातर्फे ६ हजार ६९६ कुत्र्यांचे निर्बिजीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:00+5:302021-01-08T04:07:00+5:30

महापालिकेकडून १ लाख ४४ हजार दंड वसूल औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकातर्फे शहरात मागील दोन दिवसांमध्ये १ लाख ...

Sterilization of 6 thousand 696 dogs by Manpat | मनपातर्फे ६ हजार ६९६ कुत्र्यांचे निर्बिजीकरण

मनपातर्फे ६ हजार ६९६ कुत्र्यांचे निर्बिजीकरण

महापालिकेकडून १ लाख ४४ हजार दंड वसूल

औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकातर्फे शहरात मागील दोन दिवसांमध्ये १ लाख ४४ हजार दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर थुंकणे ८ हजार ३००, विना मास्क फिरणाऱ्या एकूण २५६ व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे १ लाख २८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. राज्य शासनाने बंदी घातलेल्या कॅरीबॅगचा वापर केल्याबद्दल काही व्यापाऱ्यांना दंड लावण्यात आला.

व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ आज भेटणार

औरंगाबाद : व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ सोमवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांची भेट घेण्यासाठी आले होते. पांडेय यांनी त्यांना मंगळवारी दुपारी निमंत्रित केले आहे. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन व्यापारी प्रशासक यांना देणार आहेत.

२ हजार ७४४ शिक्षकांची तपासणी, ६ पॉझिटिव्ह

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मागील चार दिवसांमध्ये शहरातील २ हजार ७४४ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. शहरातील माध्यमिक विभागाच्या २६८ शाळा आज सुरू झाल्या.

सोमवारी दीड हजार नागरिकांची तपासणी

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी शहरात १६८२ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. १८० नागरिकांची अँटिजेन पद्धतीने तपासणी केली. त्यामध्ये १० जण पॉझिटिव्ह आढळून आले. १५०२ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले.

Web Title: Sterilization of 6 thousand 696 dogs by Manpat