शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मैदानी चाचणीस प्रारंभ

By admin | Updated: June 15, 2014 00:33 IST

परभणी : जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून प्रारंभ होत आहे़ मैदानी चाचणीसाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली

परभणी : जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून प्रारंभ होत आहे़ मैदानी चाचणीसाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, ही चाचणी ९ ते १० दिवस चालेल़ परभणी जिल्हा पोलिस दलात १४८ पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे़ ६ जूनपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली़ सुमारे ६ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी ६ ते १२ जून या काळात करण्यात आली़ कागदपत्र तपासणीमधून ३ हजार ९७२ उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत़ दररोज १ हजार उमेदवारांची कागदपत्र तपासणी करण्यात आली़ जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ही तपासणी पार पडली़ रविवारपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे़ यात पहिल्या सत्रात धावण्याची चाचणी होईल़ त्यानंतर दुपारच्या सत्रात लांब उडी, पूल अप्स्, गोळाफेक अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत़ दररोज ५०० उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडेल़ पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे़ भरती प्रक्रियेसाठी सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, उपविभागीय पोलिस अधिकारी काळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ़ विवेक मुगळीकर, राखीव पोलिस निरीक्षक राठोड, इनामदार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व परिविक्षाधिन अधिकारी भरती प्रक्रियेमध्ये नियुक्त केले आहेत़ कागदपत्र तपासणीनंतर दुसऱ्या टप्प्यासाठी ३ हजार ९७२ उमेदवार पात्र ठरले आहेत़ त्यात ३ हजार ५५० उमेदवार खुल्या गटातील आहेत़ तसेच ३९५ महिला उमेदवार आणि २७ माजी सैनिक उमेदवारांचा यात समावेश आहे़ पुरुष उमेदवारांसाठी पाच किमी धावण्याची चाचणी होणार आहे़ ही चाचणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात सकाळच्या वेळेत घेतली जाईल़ त्यानंतर दुपारी लांब उडी, पुल अप्स्, गोळाफेक, शंभर मीटर धावणे अशा स्पर्धा होणार आहेत़ दररोज ५०० उमेदवारांची चाचणी होईल़ पोलिस प्रशासनाच्या वतीने उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच भरतीच्या स्थळी पुरेसा निवाराही उभारला आहे़ ९ ते १० दिवस मैदानी चाचणी होणार असून, त्यानंतर भरती प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा होणार आहे़ (प्रतिनिधी)धावण्याची चाचणी सकाळीच पोलिस भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी धावण्याची चाचणी ही सर्वात अवघड असते़ पाच किमी धावण्याची चाचणी घेतली जाते़ दुपारी वाढलेल्या उन्हाचा परिणाम उमेदवारांवर होऊ नये, यामुळे उन्हापूर्वी सकाळच्या वेळेतच ही चाचणी घेतली जाणार आहे़ विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांची धावण्याची चाचणी झाली आहे़ त्यांच्या इतर मैदानी चाचण्या दुसऱ्या दिवशी होतील़ भरती प्रक्रियेसाठी पोलिस प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे़ उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून भरती स्थळी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे़ दहा दिवसांचा कालावधीया भरती प्रक्रियेतील कागदपत्र तपासणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, दुसरा टप्पा मैदानी चाचणीचा आहे़ साधारणत: दहा दिवस ही चाचणी चालेल़ भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, भरतीदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास उमेदवारांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़