संशोधन प्रक्रिया गतिमान

By Admin | Updated: February 3, 2015 01:00 IST2015-02-03T00:43:27+5:302015-02-03T01:00:49+5:30

औरंगाबाद : आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर ‘बीसीयूडी’ कार्यालयाकडे ‘हार्ड कॉपी’ सादर करणाऱ्या जवळपास साडेतीन हजार संशोधक विद्यार्थ्यांसाठी १५ फेब्रुवारीपासून ‘

Speeding up the research process | संशोधन प्रक्रिया गतिमान

संशोधन प्रक्रिया गतिमान

औरंगाबाद : आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर ‘बीसीयूडी’ कार्यालयाकडे ‘हार्ड कॉपी’ सादर करणाऱ्या जवळपास साडेतीन हजार संशोधक विद्यार्थ्यांसाठी १५ फेब्रुवारीपासून ‘आरआरसी’च्या बैठका आयोजित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधनासाठी (पीएच.डी.) सुरुवातीला २६ डिसेंबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी, तर ३१ डिसेंबरपर्यंत ‘हार्ड कॉपी’ सादर करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत ‘पेट-१’ आणि ‘पेट-२’ उत्तीर्ण विद्यार्थीही ‘पेट-३’ प्रमाणे संशोधन करण्यासाठी कायमस्वरूपी पात्र राहतील, असा धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयानंतर सदरील विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास पुरेसा अवधी मिळावा म्हणून कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी १५ जानेवारीपर्यंत आॅनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ दिली होती. विद्यापीठाने हार्ड कॉपी सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर जवळपास सदरील कालावधीमध्ये ‘पेट-१, २, ३’ तसेच ‘नेट’, कार्यरत प्राध्यापक, फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांपैकी ३३४५ जणांनी रीतसर ‘बीसीयूडी’ कार्यालयाकडे ‘हार्ड कॉपी’ सादर केली. त्यानंतर लगेच विद्यापीठाने प्राप्त कागदपत्रांच्या आधारे विषयनिहाय अर्जांची छाननी केली. १५ फेब्रुवारीपासून विषयनिहाय ‘आरआरसी’च्या बैठका आयोजित केल्या असून त्या २० मार्चपर्यंत चालणार आहेत. विद्यापीठाकडे गाईडची संख्या ७५९ एवढी असून, त्यांच्याकडे ५ हजार १५८ एवढ्या संशोधनाच्या मंजूर जागा आहेत, असे असले तरी, १ जानेवारी २०१५ पर्यंत या गाईडकडे २ हजार ५४६ एवढ्या संशोधनासाठी जागा रिक्त असल्याचा अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झालेला आहे.

Web Title: Speeding up the research process