शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय संकटात-तिवारी

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नांदेड: सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गोरक्षणाच्या नावाखाली माणसांच्या खुलेआम हत्या केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय ताब्यात घेतल्या जात आहेत़ आम आदमीच्या सुविधा काढल्या जात आहेत़, असे असतानाही सगळीकडे शांतता आहे़ सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़ प्रगतिशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या पाचव्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ देशात सुरू असलेल्या वाढत्या हिंसक कारवायांसंदर्भात चिंता व्यक्त करताना तिवारी म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती महोत्सव देशभर साजरा करण्यात आला़ आज गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम व दलितांची खुलेआम हत्या होत आहेत़ नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला़ आम आदमीच्या रेल्वेतील सुविधा काढण्यात आल्या आहेत़ असे असतानाही लोक शांतच राहिले़ हे मोठे कोडे असल्याचेही तिवारी म्हणाले़या संमेलनाची भूमिका मांडताना डॉ़ श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, संमेलन संस्कृतीला वेगळे वळण देणारे हे संमेलन असून वैचारिक भूूक भागविण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समृद्ध वैचारिक वारसा आहे, त्याचा जागर करण्यासाठी व समकालीन वास्तव बदलण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ संयोजक नयन बाराहाते म्हणाले, भारतातील सर्वांवर हिंदू राज्य लादण्याची भाषा आजचा शासक वर्ग करीत आहे़ हिंदू राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती एक भयानक आपत्ती असेल, यात संशय नाही़ हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे़ म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदू राज्य घडू देता कामा नये, असे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते़ त्याचे स्मरण करणे या संमेलनाच्या निमित्ताने गरजेचे आहे़ सूत्रसंचालन डॉ़ पी़ विठ्ठल यांनी केले़ मान्यवरांचे स्वागत राम शेवडीकर, प्रा़ डॉ़ यशपाल भिंगे, प्रा़ डॉ़ केशव सखाराम देशमुख, रेवती गव्हाणे, डॉ़ रवी सरोदे, सतीश कुलकर्णी, डॉ़ करूणा जमदाडे यांनी केले़ कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती़