औरंगाबाद : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या विशेष प्रयत्नाने विविध प्रकारच्या निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका आजही चालूच राहिला. लोकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार होत असलेल्या या कामांमुळे त्या त्या भागातील स्त्री-पुरुषांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.वॉर्ड क्र.७० विद्यानगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. पूर्वी याठिकाणी गुडघाभर पाणी साचायचे. पायी चालणेही अवघड व्हायचे. लोकांची ही अडचण लक्षात घेऊन विशेष निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे उद्घाटन स्वत: राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डी.ए. लिपणे, ए. एस. भोंबे, राजेश पवार,एस.एम. जोशी, साहेबराव निकम, टी. एस. खरात, बी. एल. बाजे, सुरेश सौंदणकर व मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. वॉर्ड क्र. ८४ कल्पतरूसोसायटीतील विजयनगर गल्ली नं.१ मधील सिमेंट रस्त्याचेही आज उद्घाटन करण्यात आले. हे काम राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून करण्यात आले. चांगला रस्ता मिळाल्याने नगरसेवक पंकज भारसाखळे यांच्यासह कोटकर, नांदूरकर, शिंदे, शेळके, जोशी, हिंगमिरे, इंगळे, जाधव, कोरडे, आदमाने, डॉ. चन्ने, चव्हाण, भारती, शिलवंत, सुरवसे, कोठुळे, बंब, ढगे, वेताळ, बोरा,भवर,आघाडे, बोर्डे व अमोलकचंद मुगदिया आदींनी समाधान व्यक्त केले. वॉर्ड क्र. ८४ कल्पतरूसोसायटीमधील शिवनेरी कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचेही आज राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी सुनील त्रिभुवन, राहुल चव्हाण, गुलाबराव गाडेकर, विष्णू राठोड, रामभाऊ नाईक, पिंटू टेमकर, साळुबा दाभाडे आदींची उपस्थिती होती. वॉर्ड क्र.७१ न्यायनगर येथील चौंडेश्वरी सोसायटीतील ड्रेनेज लाईनचा प्रश्न आता सुटला असून, आज पूर्ण झालेल्या लाईनचे उद्घाटन करण्यात आले. जयश्री लकारे व अनेक महिलांनी हे काम पूर्ण करून दिल्याबद्दल राजेंद्र दर्डा यांचे आभार मानले. यावेळी कांतीलाल निरपगारे, प्रा. शेषराव जाधव, अग्रवाल काका, सुनील वाहूळ, शिवा गवळे आदींची उपस्थिती होती. राजेंद्र दर्डा यांच्यासमवेत उद्घाटनप्रसंगी पंकज फुलपगर, दामूअण्णा शिंदे, राजाराम शिंदे, डॉ. बाबासाहेब पैठणे, किशोर उदावंत व गौतम आल्हाट आदींची उपस्थिती होती. छत्रपती हायस्कूलच्या मुला-मुलींशी संवाद वाटेत छत्रपती हायस्कूल लागले. चालता चालता शालेय शिक्षणमंत्री असलेले राजेंद्र दर्डा यांनी हात उंचावून या हायस्कूलच्या मुला-मुलींना शुभेच्छा दिल्या. मुले-मुली आनंदित झाली. शालेय शिक्षणमंत्र्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश केला. पाहता पाहता संपूर्ण शाळा गोळा झाली. एकत्रित आलेल्या मुला-मुलींशी त्यांनी अगदी सहज संवाद साधला. मुला-मुलींना काही प्रश्न विचारले आणि गुरुजींना वर्गात विचारण्यासाठी एक प्रश्न सांगून ठेवला. अशा गडबडीतही शाळेच्या शिक्षकांनी आपल्या शालेय शिक्षणमंत्र्यांचा सत्कार केला. टाळ्या वाजवत व खुश होत मुला-मुलींनी शिक्षणमंत्र्यांचा निरोप घेतला व आपापल्या वर्गांकडे ते निघून गेले.
इंद्रप्रस्थ सोसायटी, शिवनेरी कॉलनीत गुळगुळीत रस्ते
By admin | Updated: July 26, 2014 01:09 IST
औरंगाबाद : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या विशेष प्रयत्नाने विविध प्रकारच्या निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका आजही चालूच राहिला.
इंद्रप्रस्थ सोसायटी, शिवनेरी कॉलनीत गुळगुळीत रस्ते
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}