सिरेहक शाह बाबांचा उरुस आजपासून

By Admin | Updated: April 23, 2016 23:54 IST2016-04-23T23:51:56+5:302016-04-23T23:54:26+5:30

हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैहच्या ३६५ व्या उरुसाला २४ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे.

Siruq Shah Baba's Urus from today | सिरेहक शाह बाबांचा उरुस आजपासून

सिरेहक शाह बाबांचा उरुस आजपासून

हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैहच्या ३६५ व्या उरुसाला २४ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. २५ एप्रिल रोजी उरुसनिमित्त संदलचा कार्यक्रम आहे.
यानिमित्त दरगाह परिसरात २७ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची तयारीही जवळपास पूर्ण झालेली आहे. २४ एप्रिल रोजी उरुसाला प्रारंभ होईल. या दिवशी रात्री ९ वाजता जळगाव येथील अब्दुल लतिफ हैरा यांच्या मुशायऱ्याचे आयोजन केले आहे.
२५ एप्रिल रोजी रिसाला बाजार परिसरातून दुपारी एक वाजता संदलची मिरवणूक निघणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून रात्री ९ वाजता संदल दरगाह परिसराकडे येईल. तर उरुस कमिटीच्या वतीने २६ एप्रिल रोजी दरगाह परिसरात सायंकाळी ५ वाजता कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात उत्तर प्रदेशच्या रौशनी वारसी आणि मुंबई येथील शमीम शोले यांचे सादरीकरण होणार आहे.
यशस्वीतेसाठी उरुस कमिटीचे अध्यक्ष, दरगाह कमिटीचे अध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, नामदेव घुगे, आजमखान, सय्यद सालार, अन्वर मुनीरखान पठाण, दत्तराव बांगर यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Siruq Shah Baba's Urus from today