एकास मारहाण; तिघांविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: May 26, 2014 00:56 IST2014-05-26T00:35:39+5:302014-05-26T00:56:22+5:30

कुरूंदा : वसमत तालुक्यातील खांबाळा शिवारात सामाईक धुर्‍यावरील लाकूड नेण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

Single assault; Crime against trials | एकास मारहाण; तिघांविरूद्ध गुन्हा

एकास मारहाण; तिघांविरूद्ध गुन्हा

कुरूंदा : वसमत तालुक्यातील खांबाळा शिवारात सामाईक धुर्‍यावरील लाकूड नेण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना २३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी ३ आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खांबाळा येथील बाळासाहेब रंगराव व्होडगीर (वय ४०) हे सामायीक धुर्‍यावरील लाकूड घेवून जात असताना बाळू व्होडगीर याने ‘तू लाकूड का घेवून जातोस?’ असे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच बाबुराव चंपतराव व्होडगीर व गंगाधर बाबुराव व्होडगीर यांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने कमरेत व पाठीत मार दिला. या शिवाय जीवे मारण्याची धमकी दिल्याचे बाळासाहेब व्होडगीर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी बाळू व्होडगीर, बाबूराव व्होडगीर आणि गंगाधर व्होडगीर (सर्व रा. खांबाळा) यांच्याविरुद्ध कलम २९४, ३२३, ५०४,५०६, ३४ भादंविनुसार कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, कुरूंदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना भुजंग कोकरे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Single assault; Crime against trials