शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चिन्हांचा बिनधास्त वापर !

By admin | Updated: September 21, 2014 00:26 IST

आशपाक पठाण/ हरी मोकाशे ,लातूर निवडणूक कालावधीत घर, खाजगी वाहनांवर निवडणूक चिन्हांचा वापर करणे हे कायदेशीररित्या गुन्हा ठरत असला तरी त्याकडे वाहनधारकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

आशपाक पठाण/ हरी मोकाशे ,लातूरनिवडणूक कालावधीत घर, खाजगी वाहनांवर निवडणूक चिन्हांचा वापर करणे हे कायदेशीररित्या गुन्हा ठरत असला तरी त्याकडे वाहनधारकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे शनिवारी शहरात पहावयास मिळाले़ निवडणूक चिन्हांचा बिनधास्त वापर करीत हे वाहनधारक नेहमीच्या तोऱ्यात फिरत आहेत़ आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, अशी दक्षता घेणारा जिल्हा निवडणूक विभाग मात्र, यासंदर्भात गाफिल आहे़लोकमत चमूने लातूर शहरात विविध ठिकाणी वाहनांची पाहणी केली़ त्यात अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांवर राजकीय पक्षांचे चिन्ह, झेंडे असल्याचे आढळून आले़ लातूर शहर व ग्रामीण भागात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने पथकांची नेमणूक केली आहे़ मात्र, पथकाने संबंधित यंत्रणांना सूचना देत केवळ सार्वजनिक ठिकाणी असलेले झेंडे, पक्षाचे नामफलक व उद्घाटनासंबंधी असलेल्या कोनशिला झाकून घेतल्या़ अनेक भागातील झेंडे उतरविण्यात आले़ सार्वजनिक ठिकाणी कारवाई केलेल्या पथकाने खाजगी वाहनांकडे मात्र नजर फिरविली नसल्याचे दिसून आले़ जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी लोकमत चमूने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची पाहणी केली़ यावेळी अनेक वाहनांवर राजकीय पक्षाचे चिन्ह व झेंडे आढळून आले़ विशेष म्हणजे दुचाकी वाहनांवर निवडणूक चिन्हांचा सर्वाधिक वापर होत असल्याचे पहावयास मिळाले़ हे वाहनधारक बिनधास्तपणे निवडणूक चिन्हांचा वापर करीत आहेत़ विशेष म्हणजे काहीजण निवडणूक चिन्हांचा वापर हा प्रचारासाठी करीत असल्याचेही दिसून येत आहे़ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी तसेच अन्य पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर पक्षाचे चिन्ह किंवा पक्षाचे नाव तसेच नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांच्या नावाचे फलक व झेंडे लावण्याची लातूर शहरात मोठी स्पर्धाच लागली होती़ गणेशोत्सवात लावण्यात आलेले पोस्टर्स आचारसंहितेची चाहूल लागताच मनपाच्या अतिक्रमण विभागाने काढली़ काही भागातील सार्वजनिक ठिकाणचे ध्वजही काढण्यात आले़ मात्र, शहराच्या अनेक ठिकाणी आजही विविध संघटनांचे फलक, तसेच चौकाच्या नामकरणाचे फलक झळकत असल्याचे आढळून आले़ लातूर शहरात विविध सामाजिक संघटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ आॅटोरिक्षा, स्कुल बस तसेच अन्य वाहनांवर संघटना व त्यांच्या अध्यक्षांची नावे लिहिण्यात आली आहे़