शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:32 IST

सिल्लोड तालुक्यातील पेंढगाव येथील घटना

श्यामकुमार पुरे, सिल्लोड: तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी गारींचा पाऊस झाला. त्यात पेंढगाव येथे दुपारी ३.३० वाजता लग्न लागत असतांना अचानक पाऊस आला व वाऱ्यामुळे लग्न मंडप उडल्याने वऱ्हाडी मंडळींची धावपळ झाली. यामुळे शेतात झालेल्या चिखलातून नवदेव-नवरीला खांद्यावर उचलून न्यावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

तळणी येथील नवरदेव अतुल ठोंबरे व पेंढगाव येथील वधू भाग्यश्री चिकटे यांचा पेंढगाव येथील एका शेतात मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र वऱ्हाड लग्न मंडपात ३.३० वाजता आले. लग्नाचे अर्धे मंगल अष्टक झाले अन् अचानक वादळी वाऱ्यासह गारिंचा पाऊस झाला. पावसातच लग्न लावण्यात आले, मात्र अचानक लग्नमंडप उडून गेला. 

त्यानंतर शेतात बाजूला असलेल्या एका खोलीत कसे बसे उर्वरित लग्न लावण्यात आले. त्यानंतर शेतात पावसामुळे चिखल झाला, त्यामुळे नवरदेव व नवरीला बाहेर रस्त्यावर येता येत नव्हते. गावातील काही तरुणांनी नवरदेव व नवरीला खांद्यांवर उचलून चिखलातून मार्ग काढून कसे बसे रस्त्यापर्यंत आणले, त्यानंतर वधू वर वाहनात बसवून तळणी येथे गेले.

शेवटी गावात एका ठिकाणी वऱ्हाडी मंडळीला थांबवून जेवण देण्यात आले. हे लग्न जर वेळेवर लागले असते, तर हा प्रकार झाला नसता. मात्र नवरदेवाकडील काही तळीरामांनी वरातीत नाचण्यासाठी हट्ट धरल्याने वऱ्हाड मंडपात उशिरा आले व त्यामुळे वऱ्हाडी मंडळी व नागरिकांना त्रास सहन करावा लागला, अशी माहिती एका प्रत्यक्ष दर्शीने लोकमतला दिली.

टॅग्स :sillod-acसिल्लोडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmarriageलग्न