पोलिसांच्या मदतीने जुळल्या रेशीमगाठी

By Admin | Updated: August 13, 2014 01:43 IST2014-08-13T01:33:31+5:302014-08-13T01:43:03+5:30

अजिंठा पोलिसांच्या मदतीने दोन्ही कुटुंबांचे मनपरिवर्तन करण्यात आले अन् पोलिसांनीच कन्यादान करून दुभंगलेल्या प्रियकर-प्रेयसीच्या रेशीमगाठी जुळवून दिल्या.

Silk mixed with the help of police | पोलिसांच्या मदतीने जुळल्या रेशीमगाठी

पोलिसांच्या मदतीने जुळल्या रेशीमगाठी

श्यामकुमार पुरे, अजिंठा
देवदर्शनासाठी आलेल्या प्रेमीयुगुलास धमकावून प्रियकराच्या डोळ्यादेखत पे्रयसीवर बलात्कार केल्याची घटना २५ मे रोजी सिल्लोड तालुक्यात आमसरी येथे घडली होती. या घटनेनंतर प्रियकराने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला होता. मात्र १२ आॅगस्ट रोजी अजिंठा पोलिसांच्या मदतीने दोन्ही कुटुंबांचे मनपरिवर्तन करण्यात आले अन् पोलिसांनीच कन्यादान करून दुभंगलेल्या या प्रियकर-प्रेयसीच्या रेशीमगाठी जुळवून दिल्या.
जळगाव जिल्ह्यातील एक पे्रमीयुगुल सिल्लोड तालुक्यातील (अंबऋषी) आमसरी येथे देवदर्शनासाठी आले होते. येथील चार जणांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली व आम्ही वन कर्मचारी आहोत, तुम्ही जंगलात काय करता, तुम्हाला पोलिसांत देतो, असे म्हणून त्यांचे मोबाईलमध्ये अश्लील चित्रीकरण केले. प्रियकराच्या डोळ्यांदेखत दोघांनी पे्रयसीवर बळजबरी बलात्कार केला. तसेच त्याचे चित्रीकरणही केले. या घटनेची माहिती कुणाला दिली तर बदनामी करू, अशी त्यांना धमकी दिली. बदनामी होईल म्हणून त्या दोघांनी पोलिसांत तक्रार दिली नाही.
मात्र, या दोघांनी मित्रांची बदनामी व्हावी म्हणून मोबाईलवर ती शूटिंग फारवर्ड केली. यातूनच ही माहिती मुलीच्या घरच्यांना कळाली. त्यांनी मुलीला धीर देत अजिंठा ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी त्या चार आरोपींना अटक केली.
अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी त्या पीडित मुलीस बहीण मानले. दोन्ही परिवारांच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मनपरिवर्तन केले. त्यानंतर जुन्या विचारांना फाटा देत अखेर दोन्ही परिवार त्या दोघांचे लग्न करण्यास तयार झाले.

Web Title: Silk mixed with the help of police