शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयस तळपदे साधणार आज तरुणाईशी संवाद

By admin | Updated: October 9, 2014 00:51 IST

औरंगाबाद : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी दिलखुलास संवाद साधण्याची सुवर्णसंधी ९ आॅक्टोबर रोजी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

औरंगाबाद : ‘ओम शांती ओम’ चित्रपटात शाहरुख खानसोबतचा ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’चा संवाद... ‘इकबाल’ या चित्रपटातील अभिनयातून तरुणाईला आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देणारा आणि हिंदी- मराठी चित्रपटांतील अभिनयातून चित्रपट रसिक आणि तरुणाईच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी दिलखुलास संवाद साधण्याची सुवर्णसंधी ९ आॅक्टोबर रोजी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.शहरातील एमजीएम जर्नालिझम कॉलेजमध्ये सकाळी ११ वाजता श्रेयस तळपदे एमबीए आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता वसंतराव नाईक कॉलेजमध्ये आणि दुपारी १ वाजता छत्रपती महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना श्रेयस तळपदे याच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.मराठीतील ‘पछाडलेला’, ‘सावरखेड एक गाव’, ‘आईशप्पथ’, हिंदीतील ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘बॉम्बे टू बँकॉक’, ‘आशाएँ’, ‘वेलकम टू सज्जनपूर’ यासह अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर श्रेयस तळपदे याने अधिराज्य गाजविले आहे. ‘गोलमाल रिटर्न्स’मधील भूमिकेने चित्रपट रसिकांना खळखळून हसविले. चित्रपटसृष्टीत चमकणाऱ्या श्रेयस तळपदेला भेटण्याची संधी म्हणजे तरुणाईला अनोखी मेजवानीच ठरणार आहे.व्हॉट्सअप, फेसबुकवर शेअरश्रेयस तळपदेची एंट्री... त्याच्याभोवती शेकडो तरुण- तरुणींचा गराडा... त्याची एक छबी टिपण्यासाठी फ्लॅश मारत सर्वांचे मोबाईल आणि कॅमेरे उंचावणार, असेच काहीसे चित्र गुरुवारी महाविद्यालयांत दिसून येईल. अनेक जण हा क्षण व्हॉट्सअप, फेसबुकवर शेअर करणार यात दुमत नाही.