शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयीन प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: September 21, 2014 00:25 IST

उस्मानाबाद : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही बहुतांश शासकीय कार्यालयातील उद्घाटन, भूमिपूजनाच्या कोनशिला उघड्याच असल्याचे ‘

उस्मानाबाद : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही बहुतांश शासकीय कार्यालयातील उद्घाटन, भूमिपूजनाच्या कोनशिला उघड्याच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनने उघडकीस आणले होते. याबाबतचे वृत्त छायाचित्रांसह प्रसिध्द केल्यानंतर संबधित निवडणूक उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी खातेप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, याबाबतचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी निवडणुकीशी संबंधित अधिकारी, राजकीय नेते यांची बैठक घेऊन आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सक्त निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने बुधवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, बसस्थानक आदी ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी बहुतांश कार्यालयातील कोनशिला झाकल्याचे दिसून आले. मात्र, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत, शहर पोलिस ठाणे आदी शासकीय कार्यालयांच्या इमारतीतील व परिसरातील कोनशिला उघड्याच असल्याचे दिसून आले होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनांची कोनशिला तसेच जिल्हा परिषद परिसरातील उपमुख्यमंत्री नावाची कोनशिला उघडीच असल्याचे दिसले. महावितरण कार्यालयाच्या भिंतीवरही राजकीय लोकांचे अर्धवट पोस्टर झळकत असल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय शहर पोलिस ठाण्यात भिंतीवर नागरी हक्क संरक्षण कायद्याचे राजकीय नेत्याचे पोस्टर उघडेच दिसून आले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच संबधित कार्यालयाच्या खाते प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, याबाबत चोवीस तासात खुलासा सादर करावा अन्यथा आपल्या विरुध्द आदर्श आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)