शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

३५ तलावांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST

दिनेश गुळवे , बीड जस-जसे पावसाळ्याचे दिवस पुढे सरकत आहेत, तस-तसे जिल्ह्यातील तलावातील पाणीपातळी तळ गाठू लागली आहे.

दिनेश गुळवे , बीडजस-जसे पावसाळ्याचे दिवस पुढे सरकत आहेत, तस-तसे जिल्ह्यातील तलावातील पाणीपातळी तळ गाठू लागली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन नक्षत्र संपत आले तरी अद्यापही पाऊस पडला नाही. परिणामी बीड अंतर्गत येणाऱ्या ८० पैकी तब्बल ३५ तलावात ठणठणाट आहे. तर, २८ प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड अंतर्गत ८० प्रकल्प आहेत. यात कृष्णा खोऱ्याचे मध्यम प्रकल्प ६, लघु प्रकल्प २४ तर गोदावरी खोऱ्यातील मध्यम प्रकल्प ६, व लघु प्रकल्प ४६ आहेत. यातील ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. यामध्ये सिंदफणा, सुलतानपूर, मस्सावाडी, गोलंग्री, वाणगाव, पिंपळा, खडकी, गोविंदवाडी, शिंदेवाडी, जवाहरवाडी, मादळमोही, वारणी, फुलसांगवी आदी प्रकल्पांचा समावेश आहे. पावसाळा सुरू होऊन अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी असलेल्या धरणांमधून पाणी उपसा बंद केला आहे. तसेच, प्रकल्पात असलेले पाणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांवर शेतकऱ्यांनी फळबागा, ऊस शेती केली आहे. मात्र, या धरणांमध्ये आता पाणीसाठाच नसल्याने शेतकरीही चिंताग्रस्त आहेत. प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.२८ प्रकल्प जोत्याखालीजिल्ह्यात जोत्याखाली पाणी असलेल्या प्रकल्पांची संख्या २८ तर केवळ १७ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणी आहे. यावर केवळ एका धरणात पाणीसाठा आहे. ८० प्रकल्पांमध्ये मिळून उपयुक्त साठा केवळ १.७९ टक्के आहे.