होमवर्क न केल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारले, शरीरावरील वळ पाहून पालकांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:40 IST2025-08-21T13:38:41+5:302025-08-21T13:40:38+5:30

विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी वाळूजमध्ये शिक्षकावर गुन्हा

Shocking! Teacher beats student to death for not doing homework, bruises appear on body | होमवर्क न केल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारले, शरीरावरील वळ पाहून पालकांना धक्का

होमवर्क न केल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारले, शरीरावरील वळ पाहून पालकांना धक्का

वाळूज महानगर : वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इतिहास विषयाचे शिक्षक शहा यांनी होमवर्क न केल्याच्या कारणावरून मंगळवारी छडीने अमानुष मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, लाइननगर, वाळूज येथील मिलिंद पांडुरंग कांबळे यांचा मुलगा ऋतुराज (वय १३) हा सातवीत शिक्षण घेत आहे. दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी त्याची आई रेखा कांबळे यांनी त्याला शाळेत सोडले होते. शाळा सुटून घरी परतल्यावर ऋतुराजने पालकांना सांगितले की, इतिहासाचे शिक्षक शहा यांनी काल दिलेले होमवर्क पूर्ण न केल्यामुळे त्याला लाकडी छडीने पृष्ठभाग, डावी मांडी व डाव्या दंडावर मारहाण केली, तसेच हात पकडून पायावर पाय ठेवले. विद्यार्थ्याच्या शरीरावर वळ उमटलेले पाहून वडिलांनी त्याला घेऊन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविले असून, संबंधित शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Shocking! Teacher beats student to death for not doing homework, bruises appear on body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.