शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना घातले कांद्याचे हार

By admin | Updated: October 15, 2016 00:59 IST

कळंब :शिवसैनिकांनी शुक्रवारी कळंब येथे कृषी अधिकाऱ्यांना कांद्याने गुंफलेल्या हार घालून आपला संताप व्यक्त केला.

कळंब : तालुक्यातील पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची अस्थिर बाजारभावाच्या काळात सुयोग्य साठवणूक व्हावी यासाठी कृषी विभागाकडील अनुदानीत चाळी उभारल्या. परंतु या कांदा चाळीस अनुदान देण्यास पाच महिने निधीच नव्हता अन् पुढे आला तर दोन महिन्यापासून कृषी विभाग शेतकऱ्यांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक करत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारी कळंब येथे कृषी अधिकाऱ्यांना कांद्याने गुंफलेल्या हार घालून आपला संताप व्यक्त केला.कळंब तालुक्यात कांदा लागवडीचे प्रमाण वाढले आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतत अस्थिर बाजारभावाचा किंवा तेजी-मंदीचा सामना करावा लागतो. बहुतांशवेळा अल्पदरामुळे शेतकऱ्यांना आपला उत्पादन खर्चही पदरी पडत नाही. अशा कठीण स्थितीत हा कांदा चांगला दर येईपर्यंत ठेवावा तर कांदा हा नाशवंत असल्याने उलटपक्षी दुप्पट नुकसान होते. यामुळे यासाठी योग्य साठवणुकीसाठी अत्याधुनिक कांदा चाळ उभारणे आवश्यक असते. याच अनुषंगाने कृषी विभागाने आपल्या एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कांदा चाळ उभारणीची योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. निधीचा 'तोटा' असतानाही कळंब तालुक्यातील जवळपास ९०० प्रस्तावांना सढळ हाताने कृषी विभागाने पूर्वसंमती दिली. यातील जवळपास ५२५ शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात कृषी विभागाला अनुदान मागणीची देयकेही सादर केली. परंतु निधीच्या कमतरतेमुळे प्रथम टप्प्यात यातील ९० च्या आसपास लोकांना अनुदान देण्यात आले. उर्वरित लोकांना निधी नसल्याने आजवर रखडावे लागले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेलया शिवसैनिकांनी कन्हेरवाडी येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी तालुका कृषी कार्यालय गाठले. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे कृषी अधिकारी वसवडे यांना युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर बाराते, कन्हेरवाडीचे शाखा प्रमुख विजय कवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून कांद्यानी गुंफलेला हार घालण्यात आला. या आंदोलनात युवा सेना तालुकाप्रमुख सागर बाराते, विजय कवडे, धनंजय मिटकरी, नामदेव गायकवाड, विलास कवडे, अजित मिटकरी, वैभव कवडे, सुदाम मिटकरी, राजेंद्र कवडे, संजय कवडे आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.